पान:रानवारा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्या हातापायतलं जणू आवसान गेलं. मी खंड्याकडं पाहिलं. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याच्या-माझ्या बदनशीबाची खात्री पटली होती. “ खंडया'ऽऽ ! " माझा गळा दाटून आला. खांबाला पाठ टेकून मी तसाच बसकन मारून खाली बसलो. गुडग्यात मान घातली पण वाटलं, परवा खंडया आभाळाकडं तोंड करून रडला तसं रडावं-बेसूर, पण ते जमणार नव्हतं. जवणासाठी आई मला उठवायला आली. मला बसली जागा उठवना. माझी अन्नावरचीच नाय तर साऱ्या जगावरची वासना जणू उडाली होती. आबा घरी आलं तरी मी जेवायला उठलो नाय. वाटलं आबाना सारं सारं सांगावं. त्यांनी मला पाठ फुटेस्तोवर मारावं. मग पाप फिटलं माझं. मीच त्याला 'छू' म्हटलं. त्यातून त्याच्या जन्माचा खेळ झाला. मन शरीराला गदगदून काढीत होतं. डोळं टिपं गाळीत होतं. आबा जवळ येऊन म्हणाल, 'तुझा दोस्त मरणाच्या वाटवर हाय. पण तू उपाशी राहिलास तर त्याला जाताना लई वंगाळ वाटंल. त्याच्यासाठी दोन घास खा.' मी हमसून हमसून रडलो. जेवलो नाय. पण आबाना 'ते' काय सांगायचं जमलं नाय. त्यांच्या त्या मायेचा मला नको इतका राग आला होता; पण मी काईच बोललो नाय. त्या राती माझ्यासाठी सायांनीच जेवणाला हात आखडलं. नाइलाजानं जेवायला बसलो. डोळयापुढं मेल्या आईचं दूध पिणारं कुत्रं दिसू लागलं. गळा दाटून आला. ताटात चपाती होती. माझ्या आवडीचं कालवण होतं. मी भारावल्यासारखा ताटातली चपाती घेऊन उठलो यंत्रा- सारखा गेलो. त्याच्या पुढचात चपाती टाकली. त्यानं माझ्याकडं अनोळखी भयानक नजरेनं पाह्यलं. चपाती हुंगली. थोडी चावली नि तशीच पडू दिली. भरल्या आसवातून त्याला पाहण्यात माझी नजर जगाला विसरली होती. " आत ये की नामा. माणसं ताटकाळल्याती.' आईच्या आवाजानं मन थान्यावर आलं. पुन्हा मी पाटावर जाऊन बसलो. किती आप्पलपोटया होतो मी ? खंड्या काही खात नव्हता तरी मी जेवत होतो. सगळी माणसं खंड्या । ७