पान:रानवारा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिलं नाय पण त्याच्या भुकण्याचा जोर वाढला. खंड्या आता विहिरीच्या काठावर आला होता, मी सजागती वर बघितलं. खंड्या विहिरीच्या पायऱ्याकडं रोख लावून भुंकत होता. मी पायरीकडं पाह्यलं, पायरीवर फणा काढून बसलेला नाग मला दिसला. माझ्या घशाला कोरड पडली. ओरडायचं अवसान संपलं. एका चिन्याला धरून मी पाण्यावर तरंगत होतो. मला रडू येत होतं. खंडयाच्या भुकण्याच्या आवाजावर पाचटीला आलेला वाटंकरी तिथं आला. त्याच्या पायाच्या आवाजानं नाग सळसळ करीत निघून गेला. माझी सुटका झाली. खंड्यानं मला वाचवलं होतं. मन मोहरून आलं होतं. जीव भरून पावला होता. मी खंड्याच्या गळ्यात गळा घातला. किती आंजारलं- गोंजारलं पण जीव भरत नव्हता. - माळानं खंड्या माझ्याबरोबर पळत होता. म्होरनं एक बांड कुत्रं आलं. लई चोरटं होतं. भाकरीच्या टोपल्याच पळवायचं. वाटलं जराकरावी गंमत या चोरट्याची. मी खंड्याला " छू 55" म्हटलं. खंड्या धावला पण ते कुत्रं खंड्याला चावलं. मी रागानं त्या कुत्र्याच्या पेकटात दगडच घातला. ते कानं झिझाडत' क्युँव क्यँव' करीत पळालं. पण त्याचं ते रूप बघून मी मनात चरकलो. मला ते पिसाळल्यावाणी दिसलं. गावात मी पोरा-पोरात चौकशी केली. ते कुत्रं खयानंच पिसाळलं होतं. माझा जीव गहिवरला घाबरला. पण खंडयाला ते कुत्रं चावल्यालं मी घरात कुणाला सांगितलं नाय, गुपचूप त्याच्या जखमंवर राहिलो जखम बरी झाली. माझा जीव भांडयात पडला. हळद लावत त्या दिवशी रोजच्यासारखा खंडया फाटकात आला नव्हता. तो का आला नसावा ? त्याला कोणी सोडलं नसंल ? की पुन्हा एखादं कुत्रं वाटंत चावलं ? अिचाराच्या वावटळीत मी घरी आलो. खंडगाला साखळीनं बांधला होता. त्याला कुणी मोडलं नव्हतंच तर ! पण रोजच्या सारखी त्यानं शेपटी हालवली नाय. तो इव्हळत होता. दप्तर गळ्यात अडकवून मी तसाच त्याच्याकडं निघालो तर आई जवळजवळ ओरडलीच, आरं बाबा, त्याच्याजवळ जाऊ नगस, पिसाळलंय त्ये.' ( खंडया | ६