पान:रानवारा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येत नव्हती, सारी गडद झोपली. मी हळूच उठलो. माझी चादर खंडयाच्या अंगावर घातली. एका गोधडीत माझी थंडी कशीतरी हाटणार होती. पण खंडचा गारठणार नव्हता, याच विचारानं मला ऊब आली होती. मी सकाळी लवकर उठून चादर काढून माझ्या अंगावर घेणार होतो. पण - ' आत्ता ग बया, ही चादर कुणी कुत्र्याला घातली ग यस्वदे ? आजीच्या या आवाजानं मला जाग आली. मी तोंडावर पांघरून ओढलं. पण माझं मन सर्वांपुढं उघडं पडलं होतं. त्याच दिवशी खंड्यासाठी पांघरून तयार केलं गेलं. खंड्याची पांघरूनाची सोय झाली नि माझ्या खंडयाबद्दलच्या मागण्या वाढू लागल्या, पट्टा, घुंगरू, माळा, गोंडे, साखळी, थाळी, वाडगा सारं काही जमलं. त्याच्या वाडग्यावर त्याचं नावसुद्धा मी घालून घेतलं एक दिवस आई म्हणाली, नामा, आता जत्रंला तुझ्यासंगट खंड्यालाबी कापडं शिवू या.' ही अशी आई. तिला गंमत वाटायची. मला तिचाच नव्हं तर साय जगाचा राग आला. जगानं जर कुत्र्याला कापडं शिवायची पद्धत केली असती तर मी खंडयाला कापडं शिवलीच असती. माणसाची जातच हरामी. अगदी आप्पलपोटी. " ... आंब्याच्या सुगीत शिवारात पाडाच्या आंब्याची उतरण चालली होती. आमची आंब्याची झाडं आम्ही उतान्याकडून उतरून घेत होतो. झाडं ओढ्याच्या काठावर होती. ओढ्याचं पाणी आटलं होतं. उतारीचं आंबं अधून-मधून घरंगळत ओढ्यात जात होतं. ते मी वर आणून ढिगात ठेवत होतो. एक-दोन वेळा खंड्यानं ते बघितलं नि तो ते काम चलाखीनं करू लागला. दातात अलगद आंबा धरून आणून तो ढिगात ठेवू लागला. लागला. अशाच त्याच्या कित्येक आठवणी ....आमचा एक गरीब बैल बांधाला मोकळा चरायचा. पण कधी-मधी पिकातबी शिरायचा. त्याची दोरी धरून त्याला पुन्हा बांधाला आणलं की काम संपायचं पण ते कामही खंड्या मला करू देत नव्हता. भर दुपारी विहिरीत पोहत होतो. खंड्या धावंवर बसला होता. डुबक्या मारण्यात बराच टाइम गेला. खंड्या भुंकू लागला. सुरूवातीला मी ध्यान खंडचा । ५ ....