पान:रानवारा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्यासंग भाकरी खात होता. मी अभ्यास करताना शांत बसत होता. माझ्या आंथरूणाच्या पायथ्याशी झोपत होता. थंडीचं दिवस होतं. चावन्या थंडीनं अंग गोठलं होतं. अंगावरती चादर पांघरून मी बसलो होतो. माझं ध्यान पायशाच्या खंड्याकडं गेलं. तो अंगाचं मुटकुळं करून बसला होता. केविलवाणा दिसला. मी आईला म्हणालो, ' खंड्याच्या अंगावर चादर घाल.' ' " ह्य रंकाय आणखी नवंच ! कुत्र्याला चादर घालू व्हय ?" आईचं एवढं ऐकलं नि मी अंगावरची चादर काढून फेकली. म्हटलं, 'मलाबी नको चादर.' ? खंड्याला आईनं 'कुत्रं म्हटलं त्याचा बी मला राग आला होता. त्याला नाव होतं की, उगीच कुत्रं म्हणाली. मी रागानं लाल झालो होतो. माझी चादर पुन्हा अंगावर घालत ती माझी समजूत घालू लागली. मला कुरवाळणारा तिचा हात मी झटकला. तिचं मला काही पटत नव्हतं. मी पांघरून घेऊन झोपणार नि खंड्या ? मला आई होती पण त्याला नव्हती म्हणून ? माझा गळा दाटून आला. आईनं मला जवळ ओढून घेतलं. म्हणाली. • आरं कुत्र्याला कुठं पांघरून आसतं का ? ऐकलंस का कुठं ? बघितलंस का कुठं ?' " पण माझ्या खंडयाला पायजे. दुसऱ्या कुत्र्याचं मला नग सांगूस.' असं म्हणत मी नाकाचं पाणी वर ओढलं. आई गालात हासत म्हणाली, " बरं, उद्या तयार करीन पांघरून तुझ्या खंड्याला.' पण आज ? 4 " 4 बघ नामा, आजची रात त्याला काढू दे तशीच.' आजची रात त्याला कायतरी देकी पांघरायला.' आता ह्या लाडाला काय म्हणू ? ऐकावं ते इपरीतच एक-एक, आजच्या रातीनं काय हुणार हाय ? काल कुठं काय हुतं त्याच्या अंगावर ? ' 1 काल ? काल कसं नाय आल आपल्या ध्यानात ?" मी मनातच म्हटलं नि स्वतःलाच दोष दिला. त्या रात्री मला झोप खंड्या | ४