पान:रानवारा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता. आबा चालता चालता म्हणालं, 'नामा, ह्याला खंडचा' म्हणायचं खंडुबानं पालीच्या वाटंवर दिला म्हणून. मला नाव आवडलं होतं. 17521 जाल्या झोपायच्या आधी घरं गाठलं पाहिजे म्हणून मी घाईनं चाललो होतो. खंड्या मला बिलगला होता. घरी आल्यावर सान्यांना 'खंडचाची' अपूर्वाई त्याची कथा ऐकून प्रत्येकजण चुकचुक्त होता. खंड्याचं स्वागत झालं होतं. तो घरभर फिरून पुन्हा माझ्याजवळ येऊन बसला तेव्हा माझा रुबाब और होता. जाल्या सशाच्या कानानं सारं ऐकत होता नि सशाच्या डोळयानी 'खंडयाकडं बघत होता. बर झालं, आता जाल्या मला रोजच्यासारखा पिटींपिटी मारणार नव्हता. खंडयाला माझ्याजवळ बघून तो लांब लांबनच फिरणार हे मी हेरलं होतं. खंड्या मला पहिल्या दिवसापास्न जीव की प्राण वाटायला लागला. , दुसऱ्या दिवशी शाळंत जाताना माझ्या मानंवर जणू गाडीचं जू ठेवलं होतं. इतकं वंगाळ वाटत होतं. मी दप्तर घेऊन उभा राहिलो त्या यळंला माझ्यासंग जायाला खंड्या तयार होता. ते बघून आबाच आलं, मला शाळंत पोचवायला नि खंडया पण त्याला माझी शाळा ठाऊक झाली शाळा सुटण्याचा वकुत कळायला लागला नि खंडया मला घरी न्याला शाळंत येऊ लागला. दिवसेदिवस आमच्या दोस्तीला रंग भरत गेला. घंटा झाली. मी फाटकाकडं बघितलं. खंडचा आला. मेंढराच्या कळपावाणी आम्ही पोरं वर्गाबाहेर पडलो. फाटकात मला खंड्यानं गाठलं आनंदानं उड्या मारत तो माझं पाय चाटत होता. मी त्याला म्हटलं आणि आमची शर्यत सुरू झाली. ‘चल ' घरी पोचलो. आई म्हणाली, ' आला मुराळी. मुराळकी घेऊन, ' खंडयाबद्दल ती असं कौतुकांनं बोलायची. मी हायपाय धुऊन घोंगडीवर बसेपर्यंत आईनं माझं ताट वाढलेलं असायच. खंडयापुढंही भाकरी पडलेली असायची पण मी जेवायला सुरूवात करीपर्यंत तो भाकरीला तोंड लावायचा व लुचणारं पिलू नाही. माझं मन भरून यायचं. ती मेलेली कुत्री आठवायचं नि मी खंडयाला मायेनं आणखी खायला घालायचो, मला शाळंला आणायला खंड्या उरल्या वक्ताला येत होता. .. खंडचा । ३