पान:रानवारा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जयंत मी मागेल ते आबा घेत होतं. येताना आमच्या संग मोठं वझ झालं होतं पण मी छाती फुगवून चाललो होतो. आज जाल्यापुढं मीच भाव मारणार होतो. जत्रंकरी मुंगीवाणी होतं. गाडीवाटनं-पायवाटनं भरभरून चाललं होतं. फटफटी, टुरिंगा, टॅक्स्या आसल्या वाहनास्नी रिघावा नव्हता. ज्याला त्याला आपलंच घोडं पुढं दामटायची घाई झाली होती. त्यामुळं पायी चालणारास्नी मजा वाटत होती. त्या चढाओढींना रंगत आली होती. अशीच एक तपकिरी वाणाची टुरिंग पाठीमागनं आली नि वाकड्या भार्गानं पुढं जाऊन मूळ रस्त्याला मिळाली. त्याच टायमाला बोरीखाली कुत्रं केकाटलं. त्याच्या अंगावरन टुरिंगीचं चाक गेलं होतं. आबांचा हात ओढत त्यांना घेऊनच मी तिथं गेलो. तिथला पर्संग पाहून माझा जीव गलबलला. एका कुत्रीच्या पेकाटावरन चाक गेलं होतं नि तिचं आचक देणं चाललं होतं. तिचं पिलू तिला कुईकुई करीत लुचत होतं. माझ्या जिव्हारी घाव बसला. मला रड़ फुटत होतं. जणू बाजेवरील आईला पिणार बाळ डोळयापुढं येऊन पोटात भडभडत होतं. पुन्हा पुन्हा डोळं पाण्यानं भरत होतं. पण डोळयातलं पाणी आटत नव्हतं. हुंदका फुटत होता. आबा मला म्हणालं. "नामा, आता निघू या. घर गाठायला रात हुईल. ती कुत्री मेलीया, भडवं मोटरवालं न्हाईत. " बालं मुक्या जनावराची पर्वा करत आबा हे पिलू आता कसं जगंल ? कोण त्याला आई मेलीया पण तेबी त्याला कळत नाय ?' दूध देणार ? L मुकं जनावर हाय बच्चा हाय. काय कळणार त्याला दुनियेची " पण आबा रीत ! ... आबा, त्याला आपल्यासंग घ्यावं का ? ' असं म्हणतोस ? आवडलं तुला पिलू ? चलातर घेवू या ' आसं म्हणून आबानी हलक्या हातानी पिलू उचलून माझ्या हातात दि. त्यानं वाईच कुईकुई केलं नि लगोलग माझा हात चाटू लागलं. आता माझ्याजवळ जयंतल्या गमतीपरास दुसरी अपूर्वाई आली होती. मला जाल्यापुढं भाव मारायला मिळणार होता. मला हक्काचा दोस्त मिळाला २ | खंड्या ...