पान:रानवारा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंडया त्या सालाला पालीची जत्रा मायंदाळी भरली होती. ती माघारी फिरत होती. देवाचं दर्शन झाल्यावर, भांडयातलं दूध ऊतू जावं तसं पालीतून माणसं भराभर पांगत होती. मी नि आबा गावाकडं निघालो त्या टायमाला ऊन्हं कलली होती. पायी चालणारं जत्रंकरी, बैलगाड्या, फटफटी, जीपा, टुरिंगा, सारी आपल्या घराचा रस्ता जवळ करीत होती. 9 दरसालावाणी औंदा जत्रला आमची बैलगाडी काढली नव्हती. आई बाजंवर होती. छोटं बाळ होतं नि आजीला सारं घरकाम बघावं लागत होतं, नाय तर दरसाल आम्ही सारी बैलगाडीनं भंडारा उधळीत यायचो. सारी कापडं पिवळी चिटूक झाल्याली पण मनात हुरुप मायाचा नाय, पण त्या साली आई नुकतीच मामाच्या गावास्न आली होती. जालिंदर संग नेला होता पण त्याच्या बरोबर येताना छोट बाळबी आणलं होतं. गोरं-गोबरं बाळ मला आवडलं होतं. पण जाल्या त्याच्याबद्दल भाव खायाचा. टेचात असायचा. मामाकडं जाऊन बाळ आणलं म्हणून टेंबा मिरवायचा. मी खवळलो होतो. पालीच्या जत्रंला हटून आबा बरोबर निघालो. जाल्या झोपत असतानाच आम्ही जांच्या वाटंला लागलो होतो.