पान:रानवारा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येकानं आपलं मनोगतच जणू उघड केलं. आंगण गर्दीनं भरलं होतं. पडवीत माणसं मावत नव्हती. जो तो हळहळत होता, चुकचुकत होता. आंगणात चार-सहा माणसं मुक्यानंच शेवटच्या संस्काराची जुळवा जुळव करत होती. कमलचा देह बिछान्यावरच होता. घरी ठेवूनही तिला शेवटची आंघोळ घालता येणार नव्हती. बिछान्याभोवतीच्या खुंटया नुकत्याच उपटल्या होत्या. त्या खोलींचा दर्प पूर्वीपेक्षा अधिकच उग्र वाटत होता. घरातल्या बायकांची, मुलांची रडारड चालू होती. रडत नव्हती ती फक्त कमलची आई ! विछिन्न झालेली मूर्तीवरून भ्रमिष्ट भक्तानं हात फिरवत रहावं तशी ती कमलच्या देहावरून हात फिरवत होती. ते 'दृश्य पाहून इतरांनाच गहिवरून येत होतं मात्र कमलच्या आईच्या डोळ्यात आसवं नव्हती. मूर्ती हरवलेल्या गाभाऱ्याचा शून्यपणा त्यात होता. कष्टावरचा श्रध्दांवरचा विश्वास उडून गेला होता. तो आघात झेलायला तिचं माणूसपण शिल्लक नव्हतं, जमिनदोस्त झालं होतं. तिचा तो भ्रमिष्ट, मुका शोक, पाहणाराची छाती दडपीत होता. एक वयस्क म्हातारी तिच्या जवळ जाऊन बसली. तिनं तिच्या पाठीवर सांत्वनासाठी हात ठेवला. वाटलं - आता ही मायमाऊली हंबरडा फोडील. पण नाही, तिनं टाहो फोडला नाही. नुसती रडलीही नाही. तिच्या ओठावर पराजयाचं वेदनाकारी हासू फाकलं - रडण्याहूनही भयानक काळीज भोसकणारं! तिच्या हासण्यात सहस्र आक्रोश थिजलं होतं जणू. एक दीर्घ उसासा टाकून ती वात्सल्यमूर्ती म्हणाली, मला . • सुटली माझी कमा ! मी नाय कटाळली तिला, पण ती कटाळली या हातानी तिची सेवा केली. रात म्हनले नाय, दिस म्हणले नाय. तहान-भूक इसरून तिचं सारं केलं, जीव कुडीत हुता तवर आमी बोलत हुतो,. तिच्या यातना तिच्या न्हायल्या नव्हत्या. तिच्या जखमा बघून माझ्या काळजाला आग लागत हुती. कुणाला काय सांगत नव्हते, पण माझं दुख कमा नुसत्या नजरनं वळखीत हुती. आगदी सोसवंना की वरडत हुती, पण.. म..... म्हणायची • आई ! मला सोसंना म्हणून वरडले बग. आई, तुला लई तरास .... ओली जखम । ९६ --- ... .... ---