पान:रानवारा.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हुतो नाय का ?. काल सकाळी म्हणली आई ! तू माझी खरी आई ना ? म्हणलं 'व्हय. आसं का इचारतीस ?' तर म्हणली, ८ C • मी J • तुला माझी खरी माया आसंल, तर मला इखाची पुडी दे. तुला म्होरल्या जल्मातबी इसरणार नाय.' मी म्हणलं, 'तुला इखाची पुडी देताना मीबी घिइन चालंल का ?" मग तासभर काइच बोलली नाय. भकास बगत व्हायली आढयाकडं.' ( ह्ये बग, रकमा, आता आसला इषय काढायचा नाय. तू रग्गड सेवा केलीस. खस्ता खाल्ल्यास. त्यात तुला समाधान मिळालं ना ?" ' व्हय. दवाखान्यात नेलं आसतं तर कायबी हाती लागलं नसतं, डोळाभर बगाय मिळालं, बोलाय मिळालं, सेवा कराय मिळाली. कुत्र्या- वाणी हाडीकझिडीक करायला हिथं नर्सा नव्हत्या, कमल मला मुकली पण तिचं सोनं झालं. आई-बाच्या हातची सेवा तिला मिळाली. ती सुटली. आमी कर्मदरिद्री, कूस फाटून मागं न्हायलो.' न रडता बोलणाऱ्या त्या आईचा प्रत्येक शब्द आक्रोशतोय असा भासला, तिच्या प्रत्येक शब्दागणिक ऐकणाऱ्याच्या डोळ्यांना पाझर फोडण्याचं सामर्थ्य होतं. का ? तिचं म्हणणं खरं होतं म्हणून ? की कमल त्या भयानक यातना प्रवासातून सुटली म्हणून ? कमलचा मृत्यू हे एक करूण सत्य होतं. तिच्या आईचं म्हणणं खरं होतंही आणि नव्हतंही. शहरातील दवाखान्यात खेडुतांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीला भिऊन फळाला येतं- कमलासारख्यांचं वेदनामय आजारपण किंवा शेवटही. दवाखान्यातील लोकांची उच्चभ्रू संस्कृती आणि खेड्तांची अज्ञानी भावना व दुबळेपण यातील प्रचंड दरीचा हा परिणाम ! ooo