पान:रानवारा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पडना. आता सुगी संपलीया, माणसं मोकळी, तिला बगाय जाणारच की, पण न्हातीधुती पोरगी रडती-आरडती. तिलाच तरास हुतो. घरात चुलत्या-मालत्या हायत्या. त्यास्नी वाटतंया, ही मरून सुटंल तर बरं हुईल. आईच्या जीवाला वाटतं, माझ्या हाताच्या कष्टाला देव यॅस दिइल.' तुम्हाला वाटतं का ती बरी होईल म्हणून ? ' " माझ्या या प्रश्नावर त्या बाईनं माझ्याकडं संशयानं पाह्यलं. म्हणाली, • तिला तुम्ही पाह्यली नाय व्हय ? " पाहिली, पण अगदी सुरूवातीला.' " 'हां, तरीच ! आवो बाई, त्या पोरीच्या आंगावर चिमटभर मास महायलं नाय, हाडं हायती निस्ती लाल-पांढरा रंग फासल्याली.' ते ऐकूण मी नखशिखात शहारले, तिला पुन्हा एकदा पहावं, ही इच्छा पूर्णतः करपून गेली. ८ अलिकडं तासा दोन तासांनी कमलचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश कानावर येऊ लागला. तिच्या मरणाची आता सर्वांनाच खात्री झाली होती. अचानक केव्हाही तिच्या मरणाची बातमी थडकेल अशी प्रत्येकाची मनोभावना झाली होतो. 'अरे देवा ss ! मेलेs रेऽऽ ! " आता सोसना गऽऽ ! आई ऽऽ ! 'देवाऽऽ! आता कशाची वाट बघतोऽऽस ? नेरे देवाऽऽ !' असा करूण आक्रोश कानावर येई. मला कधी कधी वाटे इतक्या लांबूनही तिचा आक्रोश स्पष्ट ऐकू येतोय, म्हणजे ती बरी होण्यासारखी असेल. आपण जाऊन पहावं, पण तो माझा विचार तेवढ्या- पुरताच टिकत असे. तिला प्रत्यक्ष पाहणारांनी तिच्या देहाच्या यातना वेदना सांगितल्या म्हणजे मलाही वाटायचं, तिची यातुन सुटका होईल तर बरं होईल आणि -- एक दिवस त्या खेड्याचं छत आक्रोशानं वादळून उठलं. हातातलं काम टाकून जो तो कमलच्या घराकडं धावत सुटला. कमलच्या अखेरच्या श्वासाबरोबरच इतरांनी जणू निःश्वास सोडले. ‘कमा सुटली ! ' 'यातना संपल्या बिचारीच्या !" • आखरीला देवाला दया आली !! ओली जखम । ९५