पान:रानवारा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमलची एखादी किंकाळी कानावर आल्यावर तिचा विषय निघे. तिच्या भाजलेल्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. हे समजे. नुकतंच तिला पाहून आलेली एक शेजारीण सांगत होती, • जखमा भरून येईनात. औशीदाचा लेप वाळून मासापासून आलग होऊन पडतो. वाळक्या लेपाच्या खपल्या बाजूला काढल्या न्हायत्या; तर त्या मासात घुसून येदना हुत्यात. सोसणारानं तरी किती सोसायचं ? भान इसरून गुरावाणी आरडती, कमा. ' पहिल्यांदाच दवाखान्यात न्यायला हवं होतं, नाहीतर घरच्या घरी डॉक्टरचं औषध चालू करायला हवं होतं, असं तुम्हाला नाही का वाटत ?" मी न राहवून बोलून गेले. त्यावर ती शेजारीण म्हणाली, 'ती येळ निघून गेली. आता कोण आसली केस दवाखान्यात घेणार ? घरच्या घरी दवा देणारा कुठंला डाक्तर ह्या आडवळणाच्या गावात येणार ?... नि त्यो तरी जीवाची जोखीम घेईल का ? L -- अजूनही त्यांनी बघावं चौकशी करून.' ' घरातली माणसबी लई घाईला आल्याती. खचून गेल्याती. पण ती पोरगीच म्हणती, 'माझं उघडंवाकडं शिरॅर कुणा-कुणाम्होरं दावणार ? नि कशासाठी ?'.... होला तिच्या आई-बाजवळं उत्तर हाय का ? म्होरं काय व्हणार ' त्ये ' परमेसराला ठावं.' एकूण गोष्टी या थराला येऊन पोहचल्या होत्या. पंचवीस टक्के भाजलेली पोर हातची गमावणार की काय, ही माणसं ? तिला दवाखान्यात भरती केलं असतं तर आतापर्यंत ती खात्रीनं बरी झाली असती. असं मला मनापासून वाटे. ( फाल्गुनाच्या उष्ण झळा माणसांना बेचैन करू लागल्या. शरीरातून घामाच्या पाझर फुटू लागला. कमलच्या किंकाळया नित्याच्याच होत्या, पण त्या संख्येनं वाढल्या होत्या. कुणीतरी तिला पाहून आलेली बाई कळवळून सांगायची, " आवो, यवढ्या यातनातबी पोरीचं उपास-तापास चालू हैत. तिची आई जावा-भावाच्या संसारात पोरीचं करता करता रडकुंडीस आलीय. किती नवस-सायास झालं, निवद - उतारं झालं, पण आजून फेर ओली जखम । ९४