पान:रानवारा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवळच्याच देवळीत उदबत्त्याचं पुडकं होतं. दुसन्या देवळीत औषधाचं भांडं होतं, पुड्या होत्या, मेणबत्त्या होत्या. कोनाड्यात केळीच्या पानांवर ओलं गोणपाट टाकलं होतं, ती सुकू नये म्हणून असेल. एका खुंटीवर पिशवीत कापूस भरून ठेवला होता. भिंतीवरची एकही खुंटी मोकळी नव्हती; पण त्यावरील वस्तूबद्दल आम्हाला माहिती होती. मात्र कमलच्या बिछान्याभोवतीही तेरा-चौदा खुंटया होत्या त्या कशासाठी हे समजत नव्हतं. त्यावर काळपट थर साचल्यासारखे दिसत होते. रहावलंच नाही म्हणून शेवटी विचारलं, या अंथरूणाभोवती खुंट्या कसल्या हो ?” झोपंत कमल हातरूणाभाईर जाऊ नाय म्हणून ठोकल्याती त्या. कधी कधी हालचाल करताना हात-पाय हातरूणाखाली गेला तर भुईचा टणकपणा रूततो, जखम हुती, धूळ-माती लागती, म्हणून खुट्या लावल्याती. सारखं कोण हिथं बसून हाणार ?" खुंट्यांना काय लावलंय का ?. काळपट थर दिसतो...?' ‘ त्ये व्हय ? हं, त्ये जखमांस्नी औशीद लावल्यावर, तरास पडतो, हालचाल हुती, त्ये औशीद खुट्यास्नीबी लागतं. त्येचं थर हायती.' ते साफ करून टाकत जा.' .. ‘ करते की. पण ज्या त्या कामाला माझंच हात कुठंवर पुरणार ? •. न्हाऊन जातं काइ येळंला ...आता तिच्या अंगाखाली घामानं वलं झालं आसलं. जखमास्नीबी पाणी सुटतं पुसाय, पायजे, एऽ कमल.' •...कमाऽऽ. बगतीस ?. इतका वेळ डोळे मिटून पडलेल्या कमलने डोळे उघडले. 'माझे बाय, पानावरचं पाणी पुसून घिऊ दे... बाईंच्याकडे काय त्यास्नी लाजायचं व्हय ? सारखी बाई-बाई करायचीस. आताच वळख इसरून गेलीस का ? आपली माणसं हायती ती थांब हां. हालू नगस, धडपा काढून घेते... अंऽ... हं.' ... अंगावरचं कापड बाजूला व्हायच्या आधीच तिनं डोळं गच्च मिटून घेतलं होतं; पण मिटल्या पापण्यांवर अश्रू ओथंबलेलं दिसत होतं. तिच्या भाजल्या अंगावरून आमची नजर फिरताना आमच्याही उघडया डोळयांवर ओली जखम । ९२ . ...