पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/977

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्ता व वजन नष्ट झाले आहे असा कायदा वगैरे; लुप्तार्थ कायदा m. Dead-level n. पूर्ण सपाट प्रदेश m. Dead-lift n. तरफ वगैरेच्या साहाय्यावांचून उचलणे n. २ an effort under discouraging circumstances, extreme emergency प्रतिकूल स्थितीत केलेला यल m, महत्संकट n. Dead-lock n. (प्रगतीची) कुंडितावस्था f, प्रगतिस्तब्धता f, काम बंद पाडणारी लहान अडचण f. Dead-march n. लष्करी शिपाई वगैरेंच्या प्रेतयात्रेचे वेळी वाजवावयाचें गीत n, लष्करी प्रेतयात्रागीत n. Dead-meat n. विकण्यास तयार असलेले मांस n. Dead-men n. अतिमद्यपानसमारंभाचे वेळी रिकाम्या झालेल्या बाटल्या f. pl. Dead'ness n. the state of being destitute of life मेलेलेपणा m, प्राणराहित्य n, गतप्राणता f. २ the state of being destitute of vigour अचेतनत्व n, मंदत्व n, अनुत्साह m, ग्लानता f. ३ insensibility मेलेलेपणा m, बहिरेपणा m, बधिरत्व n. ४ dullness फिकेपणा m, हिमळपणा m. ५ coldness, indifference उदासीनता f. Dead-pay n. हजिरीपटावर नांवे असलेल्या मृत शिपायांबद्दल लबाडीने घेतलेला पगार m. Dead-reckoning n. नक्षत्रे न पाहतां जहाजे कोणत्या ठिकाणी आहेत तें ठरविण्याची रीत f. Dead-sea n. मृतसमुद्र m. Dead-set n. निकराने व फार वेळ केलेला प्रयत्न m. Dead-shot n. अचुक नेम m. २ अचुक नेम मारणारा m. Dead-stock n. (ज्याच्या) पासून मिळकत नाही असे सामान n, शिलकी सामान n. Dead-stroke a. उलट धक्का -प्रत्याघात खाल्याशिवाय. Dead-wall n. खिडक्या किंवा जाळ्या नसलेली भिंत f. Dead-water n. गलबत चालत असतांना (मागील बाजू) खाली भोवऱ्यासारखें येणारे पाणी n. Dead-weight n. निरूपयोगी-फाजील वजन n- ओझें n. Dead-wind n. जहाजाच्या तोंडाचा (समोरून येणारा) वारा m. Dead-wood n. बळकटी येण्याकरितां जहाजाच्या मागच्या प्रत्येक भागास मारलेल्या लांकडी फळ्या वगैरे. Dead-work n. प्रारंभी करावे लागणारे गैरफायदेशीर काम n, जुने-निरुपयोगी काम n. The wind is dead against us आमच्या दिशेच्या अगदी उलट दिशेने वारा वाहत आहे. Let the dead bury the dead मागच्या सर्व गोष्टी विसरा. To flog a dead horse उलगडा केलेला प्रश्न पुन्हां उकरून काढणे, "खाजवून खरूज काढणे." Working for a dead-horse अगाऊ घेतलेल्या पगाराबद्दल काम करणे. I am at a dead lift मी मोठ्या संकटांत आहे. Waiting for dead men's shoes, मेलेल्या मनुष्याची मालमत्ता मिळण्याची वाट पहाणे-मिळण्याकरितां टपून बसणे. To make a dead set at a thing एखाद्या गोष्टीचा बरा किंवा वाईट निकाल करणे. To make a dead set upon a person एखाद्याच्या अंगावर तुटून पडणे. Deaf (def) [M. E. deef, A.S. deaf.] a. बहिरा, बहिरट (तिरस्कारार्थी), फुटक्या कानाचा, बधिर, मंदकर्ण, कानफुटका, भेरळ, भेरकट (loosely). [A.D. PERSON बहिरा मनुष्य, भैरी, भैरोबा OR ज्याला भैरोबाची OR भैरवाची सेवा आहे, ज्याचें कानपूर ओस झाले. TO BECOME D. बहि