पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/978

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रावणे.] २ unwilling to hear or listen न ऐकणारा, बहिरा. ३ determinately inattentive जाणून बुजून लक्ष्य न देणारा, बहिरा. Deaf'en v.t. to make deaf बहिरा-बधिर करणे, कान m. pl. बंद करणे-फोडणे. ३ to stun बंद करणे g. of o., कानठाळी n. pl. or कानटाळी m. pl. बसविणे g. of o., कानठाळ्या बसविणे. D. v. i. बहिरावणे, कानठळी-ळें n. pl. -ळ्या f.pl. कानटाळी-ळें n. pl. बसणे, कान m.pl. जाणे-फुटणे g. of s. Deaf'ening n. बधिर करणे. Deaf'ly adv. Deaf-mute n. बहिरा आणि मुका m. Deaf'ness n. बहिरेपणा m, बधिरत्व n, श्रवणाभाव m. Deal (del) [ M. E. deel, A.S. dcel, a share.] n. part, portion, share (बराचसा) भाग m, विभाग m, अंश m. २ the process of dealing cards to the players, the portion distributed (पत्यांची) वांटणी f. ३ [Prob. Dut. deel, a plank, threshing floor.] देवदारूची ७ इंचांपेक्षा रुंद व सहा फुटांपेक्षां लाब फळी f. ४ देवदारू-चें लांकूड n. Deal (del) [M. E. delen, tu divide. ] v. t. to make distribution विभागणे, वांटणे, २ पत्ते वाटणे, विभागणे, वांटणी करणे; as, "To D. the cards." ३ (with out ) एकसारखें देणे. D. v. i. to do a distributing or retailing business किरकोळ व्यापार m-उदीम m. करणे: २ to make distribution वांटणी f. करणे. ३ (with with or between) to act as an intermediary in business or any affair मध्यस्थी करणे. ४ to trade, to do business देवघेव करणे. ५ to conduct one's self वागणे, व्यवहार करणे. ६ to contend with, to treat with by way of opposition, check or correction झगडणे, गांठ असणे. [To HAVE TO DEAL WITH गांठ f-प्रसंग m. असणे IN. CON.] Deal'er n. देवघेव करणारा m, व्यापारी m, सवदागर m, (for more meanings see Verb:) २ पत्ते वांटणारा m. Deal'ing n. व्यापार m, धंदा m, उद्यम m, सवदा m.३ व्यवहार m, देवघेव f. ४ वागणे m, व्यवहार n. ५ संसर्ग m, गांठ f. [DOUBLE DEALING दुटप्पी वर्तन n, बोलणे एक व करणे भलतेच असे वर्तन n, उच्चाराविरुद्ध आचार करणे n. FAIR DEALING चोख वर्तन n, सचोटीची वागणूक f. ] Dean (den) [ O. Fr. deien, (Fr. doyen)-Low L. decanus, a chief of ten-L. decem, Sk. दश, ten.] n. an ecclesiastical dignitary क्याथेडलचा मुख्य धर्माधिकारी m, (युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधील एखाद्या शिक्षणशाखेचा) मुख्य अधिकारी m, शिक्षणशाखाध्यक्ष m, शाखाध्यक्ष m. ३ युनिव्हर्सिटीच्या चालकमंडळीचा चिटणीस m, युनिव्हर्सिटीतील विशेष शिक्षणशाखेचा अध्यक्ष m, चिटणीस m. Dean'ery n. वरील धर्माधिकाऱ्याचें रहाण्याचे ठिकाण n. २ त्यांचा अधिकार m-मर्यादा f-क्षेत्र n. ३ (त्याचें) उत्पन्न n. Dean'ship n. धर्माधिकाऱ्याचा-धंदा m. Rural dean खेड्यापाड्यांतील धर्मोपदेशकांवर देखरेख करणारा अधिकारी m.