पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/975

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखाचे दिवस गेले, मी सुखाचे दिवस पाहिले आहेत. To-day a man and to-morrow a mouse आज राव, उद्या रंक. Days of grace हुंडीची मुदत भरल्यावर फेड करण्याकरितां जी (तीन दिवसांची) जास्त मुदत देतात ती, 'तीन दिवसा गलासचे.' Astronomical day मध्याह्नकाळापासून मध्याह्नकाळापर्यंतचा दिवस m, ज्योतिपदिन m. Mean solar day मध्यम सौरदिन m. Sidereal day नक्षत्रमानाचा दिवस m, नाक्षत्रसावन दिवस m. Civil day मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंतचा दिवस m, इंग्रजी व्यावहारिक दिक्स m. Jewish day दोन सूर्यास्तांमधील काळ m. Daze ( dāz) [M. E. dasen, to stupefy. Swed. dasa, to lie idle.] v. t. to stupefy with excess of light, with a blow, cold or with fear दिपवणे, चकवणे, चकित करणे, थक्क करणे. Dazzle (daz'l) [ Frequentative of daze. ] v. t. to bewilder with display or brilliancy of any kind दिपवणे, दिपवून सोडणे. २ to overpower with light (शोभेने-तेजाने) चकित करणे. D. v. i. to be intensely bright दिपणे, चकाकणे. ३ to be confused by excess of brightness तेजाने चकित-थक्क होणे. गोंधळून जाणे. D. n. a light of dazzling brilliancy दिपवणारे तेज n, चकचकाट m, झकझकाट m. Dazz'ler n. Dazz'ling a. दिपवणारा, तेजःपुंज. Dazz'lingly adv. De (de) [A Latin prefix.] De हा उपसर्ग ल्याटीन भाषेतून घेतला आहे व ह्याचे अर्थ 'पासून', 'खाली'. 'दूर' असे आहेत; as, in Debark, Decline & Decamp. फ्रेंच भाषेतून आलेल्या शब्दांत De याचा अर्थ Dis किंवा 'भिन्न', 'वेगळाला' असा आहे. Derange, Deform इत्यादि शब्दांत De ह्या उपसर्गाचा अर्थ 'नकार' किंवा विराेध' ह्या उभयार्थी आहे. Deprave, Despoil, Declare, Desolate इत्यादि शब्दात De याचा अर्थ 'आधिक्यसूचक' असा आहे. cacon (de-kn) [M. E. deken; A. S. diacon-~~-L. diaconus-Gr. diakonos, ã servant, a deacon.] n. विशप व प्रीस्त यांचा दीक्षा दिलेला सहकारी, डीकन m. २ ख्रिस्ती एक्ल्लेलियतील (चर्च) आचार्याचा तिसरा वर्ग m. ३ प्रेसबिटेरियननामक ख्रिस्ती धर्मपंथांत 'मिनिस्टर' आणि 'एल्डर्स' यांच्या खालच्या दरजाचा सहकारी. यांच्याकडे "देवालयाच्या वतीने गरिबांना साहाय्य करण्याचे काम असते. Dea'coness n. (चर्चचे काही काम करण्याकरिता नेमलेली) डीकनीण f. Dea'con-hood n. डीकनधा हुद्दर m. Dea'conry, Dea'conship n. Dead (ded) [ M. E. deed. A. S. dead, dead. ] a. deprived मेलेला, मृत, गत, मयत, प्राणविरहितविद्दीन. [ SOME COVERT OR SOFTENING TERMS USED IN MENTIONING a dead person ARE:-वैकुंठवासी (IF HE HAD BEEN A WORSHIPPER OF VISHNU), कैलासवासी ( IF A WORSHIPPER OF SHIVA), स्वर्गवासी, दिवंगत, स्वर्यात, " लोकांतरगत, लोकांतरप्राप्त, परलोकगत.] २ destitute of life, inanimate निर्जीव, जड, अचेतन, निचेष्ट; as "A