पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/918

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

C. hand at cards. " Crack-brained a. वेडगळ सर, वायचळलेला, विक्षिप्त, माथेफिरू (?). Cracked a. भेगललेला, फुटका. २ (colloq.) विक्षिप्त, लहरी. Crack'er n. फोडणारा. २ (obs.) पत्राजखोर मनुष्य m, बढाई करणारा. ३ फटाका, फटाकडी, फटाकी. ४ पातळ व कुरकुरीत क्रेंकर नांवाचें बिस्कूट. Crack-jaw a. उच्चारण्यास कठीण, जबडा फाडणारा. Cracks'man n. घरफोड्या, भिंतफोड्या. Crack-credit n. पत घालविणे. Crackle ( krak'-l.) [Dim. of crack. ] v. i. चटचटणे. करकरणे, तडतडणे. २ फडफडणे, कडकणे. ३ भरभरणे, भरारणे. C. n. राहून राहून तडतड होणारा आवाज m, कडकडाट m. २ पोटांत बिघाड होऊन होणारा खळखळाट m. Crack'led a. Crack'ling n. तडतडाट m, फुरफुराट m. २ फडफडाट m, खडखडाट m. Crack'lingly adv. Crack'ly a. (ढि)-ठिसूळ. Crack'nel n. एका जातीचे हलकें व कुरकुरीत बिस्कूट n. Cradle ( krā-'dl ) [ A. S. cradol. ] n. पाळणा m, पालक-ख n, टारले n. [C. SUSPENDED FROM A STAND घोडपाळणा OR घोडेपाळणा m. CORD, BAR, &c. SUPPORTING A C. वराती f, वरात. FROM ONE'S C. पाळण्यांपासून, पाळण्यांतल्यापासून, बाळपणापासून. ROPE To SWING A C. झेपटा m, झेंपसा m, झिपुसा m. ] २ surg. (as for a broken bone, &c.) पाळणा m. ३.frame, bed घोडी f, सोन्याची माती झारण्याचा-साफ करण्याचा पाळणा m. ४ infancy or very early life बाल्यावस्था f, बाळपण n. ५ धान्य कापण्याचा दांते असलेला विळा m. ६ तांब्याच्या पत्र्यावर चित्रे उठविण्याकरितां ठसे तयार करण्याचे यंत्र n. C.v.t. पाळण्यांत निजविणे. २ बालसंगोपन करणे. Cra'dled a. Cradle-scythe n. पेटीला बसविलेला बांकदार विळा m, कापलेला जिन्नस पेटींतच पडावा अशा रीतीने हा विळा पेटीला बसविलेला असतो. Cradle-walk n. दुतर्फा झाडांचा रस्ता m. From the cradle आरंभापासून, जन्मापासून. Craft ( kraft ) [ A. S. craft, strength, skill, art, cunning. ] n. कावा m, कपट n, कावित्र n. २ हुन्नर f, कला f, हिकमत f, युक्ति f. ३ धंदा m, व्यवसाय m. ४ एकाच धंद्यांतील लोक m. pl. (taken collectively); as, " The C. of iron-mongers." वाहन n, मचवा m, होडी f. C.v.i. (obs.) कपट करणे, डावपेंच लढविणे. Craft'ily adv. Craft'iness n. कावेबाजपणा m, हिकमतगारी f, लुच्चेगिरी f. Craft'less a. Crafts’man n. कारागीर m, शिल्पी m. Craft'smanship, Craft'manship n. कारागिरीचें काम f, कारागिरी f. Crafts'master n. हुन्नरी m, कसबी m, कारागीर m. २ वस्ताद, अट्टल. Craf'ty a. युक्ति-लुच्चेगिरीसंबंधी. २ धूर्त, कावेबाज, मतलबी. Crag (krag) [Welsh. craig, akin to Gael. creage.] n. कडा m, खडपा, सुळका m, शृंग n. [ A PERPENDICULAR C. उभा खडपा m. ] २ fore end of the back bone मोऱ्हांटा m. [ THE C. OR NECK-PIECE OF MUTTON यिव OR यीव f. THE C. AND THE