पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/917

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. mech. एक प्रकारची यारी f, जड वजन उचलण्याचे यंत्र n, गलबतें गोदीत लोटण्याचे यंत्र n. ४ तिरसट मनुष्य m. C. v. t. (obs.) to make sour or morose तिरसट करणे; as, "Sickness sours or crabs our nature." C.a. तिरसट, रागीट, तापट. Crabb'ed a. तिरसट. २ characterized by harshness or roughness कठीण, खडतर, खाष्ट, न समजण्यासारखें, किचर, किचरट, दुर्बोध; as, "C. handwriting." Crabb'edly adv. तिरसटपणानें. Crabb'edness n. खाष्टीपणा m, दाष्टपणा m, करडी मरजी f, २ खचरटपणा m, &c. Crab-faced a. तिरसट मुद्रा असलेला. Crab'ite n. अश्मीभूतखेंकडा m. Crab'like a. खेकड्याप्रमाणे चालणारा, खेकडचाल्या. Crab-louse n. मांडीच्या सांध्यांतील केसांत उपद्रव देणारी खेकड्यासारखी ऊ f. Crab's-eyes or stones n. pl. Crab-sidle v.i. खेकड्याप्रमाणे एका बाजूने जाणे, खेंकडचालीने चालणे. Crab jaws n. pl. कासेफोड. To catch a crab (वल्हवतांनां) वल्हें पाण्यात बुडविण्यांत किंवा बाहेर काढण्यात चूक करणे. Claw of a crab आंकडा, अंकडा. Crack (krak) [A.S. cracian, to crack. cf. Sk. गर्ज्.] v.t. to break or burst with or without entire separation of parts फोडणे, भेगलणे, तडकणे, उकलणे, तडा पाडणे: as, To C. nuts, To C. glass. २ to distract, to craze, to affect deeply with sorrow (हृदय छाती) फाडणे, विदीर्ण करणे, फोडणे (ने), (चा) मगज फाटणे in con. & g. of o. ३ to snap कडकडावणे, वाजवणे, तडतडवणे, फडकावणे, कडकडवणे; as, To C. a whip. ४ to extol वाखाणणी करणे. [TO CRACK A BOTTLE बाटली उघडून ती पिणे. TO CRACK A CRIB ( slang.) घरफोडी करणे. To CRACK ON भर-घालणे, वाढवणे. ] C. v. i. to burst or open in chinks भेगलणे, तडकणे, भंगणे, उकलणे, उलणे, तडा जाणे, चिरणे. intens. तडाडणे, फाटणे, तडकून जाणे in con. २ (colloq. ) to be ruined, to fail भंगणे: as, “ The credit of exchequers C.s when little comes in and much goes out: ३ to utter a loud or sharp sudden sound कडकडणे intens. कडाडणे, खडाडणे, खरारणे; as, " A thunder where the clouds in autumn C." ४ to brag, to boast ( with of ) शेखी. मिरवणे, बढाई f. करणे-मारणे. C. n. a chin, fissure, cleft, crevice फट f, संधि m. f. g. of o., सांध f, भेग f, भेर f, खांड f, चिरण f, तडा m, विंच f, चीर f, चील f, चीण f, ऊट f. [CRACKS AND CRANNIES compreh. NOOKS, CREVICES AND CORNERS सांधीकोंदी f. pl. ] (as of some vessel or thing) चीर f, फूट f, दोरा m, दोरवा m, तडक f, तडा m, छेद m, फाटफूट f. ३ sudden and sharp sound तडक f, तडाक m, कडाखा m, तडतडाट m. [with a C. काडकन ताडकन.] ४ sounding stroke फटकारा m, चटकारा m, चटकणी f, चडक f, चडकण f, चडकणी f, तटकारा m. ५ (obs.) तिरसट मनुष्य m, विक्षिप्तमनुष्य m, भ्रांतचित्त. ६ (obs.) शेखी f, पत्राज f. C. a.