पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/702

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवहाराचा, जनव्यवहारविषयक, जनव्यवहारासंबंधी, लोकव्यवहारविषयक-संबंधीं. २ relating to a manas a member of a body politic जानपदीय, सामाजिक, (S) सांसारिक. (S) ३ not ccclesiastical or military मुलकी, मुलकी कामाचा, मुलकी प्रकरणाचा, गांवखात्याचा. ४ complaisant, polite, courteous, &c., बोलून चालून चांगला-गोड, &c.,माणुसकीचा,मिळाऊ,गोडबोल्या, विनयसंपन्न, माणुसपणाचा, गृहस्थपणाचा,गृहस्थी स्वभावाचा, सुशील, आदरशील, सालस, विनयी, सत्कारी, शिष्टसंप्रदायी, सभ्य, आदरनिष्ट. ५ दिवाणी. ६ व्यवस्थित, सुधारलेला, सुशिक्षित, सरकारच्या कायद्याप्रमाणे वागणारा. Cvil'ian n. one employed on civil duties मुलकी काम करणारा-पाहणारा, &c., गांवखात्याचे काम पाहणारा. &c., रोमन लोकांचे कायदे जाणणारा. २ कायद्यांत प्रवीण. ३ रोमन लोकांचे कायदे जाणणारा शिक्षक. Civ'ilist n. (obs.) मुलकी कायद्यात प्रवीण. Civil'ity n. (v. A. 4.) complaisance, politeness, courteousness शिष्टता f, माणुसकी f, मनुष्यपणा m, माणुसपणा m, गृहस्थगिरी f, गृहस्थपणा m, तवाजू f, भलमाणसाई f, भलाई f, सभ्यता f, सुजनता f, सुजनत्व n, सौजन्य n. [Civilities and courtesies आदरसत्कार m, आदरमान n, आदरउपचार m. pl., मानसन्मान m, ताजीमतवाजू f, आगतस्वागत n, मुजारत f, उपचार m, pl., ऊठबैस f, उठाबसा f. (v. कर, ठेव). Empty C. पैठणी आदर शुष्कोपचार m. pl. For the civil civility, for the saucy sauce' अहो तर कांहो, अरे तर कांरे. Civ'illy adv. माणुसकीनें, गृहस्थपणाने, गृहस्थरीतीने, सालसाईनें, भलेपणाने, सभ्यतेनें. Civ'isim_n. the principles of good citizenship नागरत्व n, सरकाराविषयीं पूज्य बुद्धी f. Civil-case n. दिवाणी खटला m. Civil-court दिवाणी अदालत f. Civil-death निवृत्ति f, संसारत्याग m. Civil-engineer' वास्तुविद्याविशारद पूल, तळी, वाडे वगैरेंच्या बांधकामावर देखरेख ठेवणारा (opposed to mechanical engineer ). Civil-engineering (opposed to mechanical engineering) n. पूल, कालवे, वगैरे बांधण्याचे काम n, इमारतविद्या f, वास्तुविद्या F. Civil-law मुलकी कायदा m, दिवाणी कायदा m. Civil list n. (राजाच्या खासगी खर्चाकरितां तोडून दिलेली) खानगीकडची नेमणूक f-रक्कम f, राजाच्या खाजगत खर्चास लागणारा पैसा m.२ सरकारी तिजोरीतून पगार घेणारे अमलदार, मुलकी आफिसरांची यादी. Civil list pensions राजाची कृपा म्हणून दिलेले पेन्शन n. Civil service n. मुलकी खात्याची नोकरी. Civil state n. सुजनसमाज m. Civilsuit n. खाजगी हक्कासंबंधी अथवा इजा झाली असतां केलेला दावा m, दिवाणी मुकदमा m. Civil war n. स्वचक्र (परचक्राच्या उलट), एकाच देशाच्या लोकांची आपआपसांत लढाई f, यादवी. Civil surgeon (opposed to military surgeon) गांवखात्याकडील वैद्य m, मुलकी वैद्य. Civil year (कायद्याप्रमाणे) व्यावहारिक वर्ष n, सरकारी वर्ष (तीनशे साठ दिवसांचें). Civilise-ze (siv-il-iz) [ L. civilis, civil. ] v. t. माणुस