पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/703

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कीन-मनुष्यांत आणणे, माणुसकी f, मनुष्यसा करणे, सुधारणे, शिक्षित करणे, संस्कृत-विद्याचारसंपन्न करणे. Civ'ilisable a. रीतीभातींत व कलाकौशल्यांत सुधारणा करता येण्याजोगा, संस्करणीय. Civilisa'tion n. (v. V.)--act. मनुष्यांत आणणे n. &c.-state माणुसकी f, माणुसपणा. २ संस्कृति f, सुशिक्षितावस्था f. Civ'ilised p. a. सुधारलेला, मनुष्यांत आणलेला, माणुसकीत आणलेला. २ विद्याचारसंपन्न, संस्कृत, सुशिक्षित. ३ सुधारलेल्या लोकांसंबंधी, विद्याचारसंपन्न लोकांसंबंधी. Civilised government सुधारलेली राज्यपद्धति f. Civ'ilizer n. सुधारणा करणारा. Clack (klak) [Fr. claquer, to clap.] v. i. to make a sharp noiss खणखण होणे, ठकठक घाजणे, खटखटणे. २ to prate लबलब बोलणे, वटवटणे, बकबकणे. C.v.t. टकटक करणे, खणखण करणे. २ बडबडणे, बकबकणे, डोके उठवणे. C. n. an unceusing and wearying speech वटवट F, टकटक f, ठकठक f, खटखट f. २ टकटक करणारी वस्तु. ३ वटवट f, बकबक f. बकवा f. ४ a vociferous woman वटवटीबाई f, वटवट करणारी, गजघंटा f, कर्कशा f, नारी शंकरची घांट (?) f. ५ colloq. जिव्हा f, जीभ f. ६ क्लॅक पडदा m. n. Clack'-dish n. खटखट वाजणारी भिकाऱ्यांची थाळी. भिकारी या थाळीचं झांकण लोकांचं लक्ष जावे म्हणून वाजवीत असतात. Clack'er n. a clacking instrument ( to frighten birds, &c.) खटखट n, ठकठकें n, फटफटें n. खुटखुटें. Clack'valve खटदिशी वाजणारे उघडे झांकण n. Clad ( klad) or Clothed. pa. p. of Clothe (वस्राने) झांकलेला,(कोणत्याही वस्तूनें) झांकलेला, परिधानयुक्त, वस्त्राच्छादित, पोशाख केलेला. २ fig. अलंकृत, भूपित, सनाथ, युक्त; as, “In wealth and bliss was Clad." Clados (klad'os) [Gr. klados, a sprout.] n. bot. खांदी f, फांदी f हा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडला असतां Clado असें ह्याचे रूप होते; as, Clado-carpus. Clag (klag) [of. Clog: ] v.i. (मातीने-मळाने ) खराब होणे, चिकटणे, डकणे.C. v. t. (मातीने-मळाने) कपडे-केस इत्यादि खराब करणे, बिघडवणे. C. n. चिकटण n, डकण n, चिकटा m. Clag'giness n. चिकटाऊपणा m. Clag'gy a. चिकटाऊ, चिकट. Claim (clam) [O. Fr. claimer---L.clamare, to cry out, to call, to proclaim, to declare aloud, to call upon, the verb to Claim has two principal senses:- (1) to demand as one's own on the ground of right. (2) to assert and demand recognition of (an alleged right, title, possession, attribute, acquirement or the like). Sense 1 claims the delivery of the thing : Sense 2 the admission of an allegation.] v. t. हक्काने वारशाने मागणे. २ दावा करणे-सांगणे, सत्ता सांगणे. ३ (ची) योग्यता दाखविणे, (चा) हक्क स्थापणे, (हक्काने येणारी) पात्रता असणे, with g. of s.; as, He claims our attention. C.v.i. हक्कदार होणे, हक्क सांगणे, हक्काने मागणें ; as, "We must know how