पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/701

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Cithara (sith'a-ra ) [Gr. kithara, a doublet of Guitar.] n. प्राचीन काळचे एक प्रकारचें सिथारा नावाचे तंतुवाद्य n. Citizen (sit'i-zen) [O. E. citesein, from O. Fr. citisain, in which s was an insertion.] n. a. resident of a city पौरजन, नगरवासी, शहरवाला, नगरवाला, नगरस्थ, पौर, शहरवासी, नागरिक, नागर, २ (प्रतिनिधि किंवा अम्मलदार निवडण्याचा हक्क असणारा) नगरस्थ m. Cit'izeness (R) नगरवासी स्त्री f. Cit'izen a. नगरवाशासारखा, नागरिकासारखा- गुणी-सुशील- नम्र. २ (obs.) विलासी, सुखाभिलाषी, चैनी. Cit'izenise v. t. (obs) रहिवासी करणे. Cit'izenry n. सर्व नागरिक लोक, पौर-गण-वृंद. Citi'zenship n. पौरवृत्ति f, पौराधिकार m, नागरिक लोकांचे हक्क m, पौरजनत्व n. Fellow C. सहनागरिक, पुरसखा. Citron (sit'run) [Gr. Kitron, a citron.] n.- (the tree) महाळुंग f, मातुलिंग n, ईड f, तोरंजन n, महाफल n, महाळुंगाचा वृक्ष m.--(the fruit) मातुलुंग n (pop.) मातुलिंग n, महाळूंग n, ईड n, इंडनिंबू n, तोरंजन n, महाफल n. Cit'rate n, लिंबाच्या रसाचे गुणधर्म असणारा क्षार, सिट्रिक अम्लाचे लवण. Cit'reous a. महाळुंगी, महाळुंगी रंगाचा, पिंवळा. Cit'ric a. chem. महाळुंगाचा, महाळुंगापासून काढलेला. Cit'rine a. महाळूंगी रंगाचा. C. n. महाळूंगी रंग m. Cit'ron-wood, Cit'rus-wood n. प्राचीन रोमन लोकांचे मोल्यवान् वस्तु करण्याचें लांकूड n. Citric acid n. लिंबाचें अम्ल. City (sit'i) [L. civitas, a city.] n. शहर n, नगर n. dim. नगरी f, पत्तन n, पुर (pop.) पूर n, (so written only as an affix, as in पंढरपूर), पट्टण n, पुरी f. spec. सनदी शहर n. [Holy C. धर्मपुरी. Walls of a C. or town शहरपन्हा m. ] C. a. urban शहरी, शहरचा, नगरचा, नागरिक, पौर. Cit'y-commissioners n.pl. म्युनिसिपालिटीचे सभासद. City-fathers civic rulers महाजन, ग्रामश्रेष्ठ (म्युनिसिपालिटीच्या सभासदांना हा शब्द लावतात). City'-mission n. मोठाल्या शहरांत खिस्ती धर्माचा प्रसार करणारी मंडळी. Civ'ic a. of or belonging to a city शहरचा, नगराचा, शहरी, नगरासंबंधी-विषयक, नागरिक. City of God, Heavenly city n. देवाची नगरी f. (Psalms XLVI 4.). City of refuge आश्रयाचें नगर n, प्राचीन काळी ज्या नगरांत मनुष्यवध चुकून करणाऱ्या मनुष्यास रहावयास लावीत असत तें नगर n. (refer to Joshua XXI. 13.) Eternal city n. प्राचीन रोम शहर. Holy-city जरुशलेम. The city, the city of London लंडन शहरांतील मोठ्या व्यापाराचा भाग. Civet (sivet) [ Fr. civette, civet.] n. जवादी मांजराची कस्तुरी f, मार्जारकस्तरिका f, ओतुर्मद m, २ zool. जवादीमांजर n. often called more fully Civet-cat. C.v.t. कस्तुरीचा वास लावणे. Civil ( siv'il) [ L. civis, a citizen.] a. relating to the community, or to civil affairs लोकव्यवहाराचा, जन