पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/678

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे, पसंत करणे.] २ the power of choosing, option निवडण्याची मुखत्यारी f-अधिकार m. ३ पसंती f, खुशी f. ४ निवडक-निवडलेली वस्तु f. ५ the best part. निवड f, उत्तमांश m, उत्तमभाग m. ६ निवड करण्याकरितां एक किंवा अनेक वस्तु f. pl. C. a. select, excellent, precinus निवडक, निवडीक, शेलका, अस्सल, पसंत, खातरीचा, नगजानगजीचा, संग्रहार्ह, उत्कृष्ट, उत्तम, उंचा, सरस, उमदा, वेंचक, नामी, अमूल्य. २ selected with care and due attention to preference निवडलेला. ३ (with of) using with care जपून खर्च करणारा, जोखून खर्च करणारा; as, To be C. of time or money. Choice-drawn a. (Shakes.) काळजीने निवडलेला. Choice'ful a. पुष्कळ निवडी करणारा, चोखाळ. Choice'ly adv. काळजीपूर्वक. Choice'ness n. उत्कृष्टता f, चोखपणा m. Hobson's choice (named from Tobias Hobson, the Cambridge carrier who let out horses and is said to have compelled customers to take the horse which happened to be next the stable door, or go with out ) हॉब्सनी निवड f, जुलमाने करावयास लावलेली निवड f, पाहिजे असल्यास देतो तें ध्या नाहीतर वाट धरा अशा धमकीने करावयास लावलेली निवड f. To take one's choice आपल्या आवडीप्रमाणे घेणे. Choir (kwir) [O. Fr. cuer, Fr. chceur. L. chorus.-Gr. choros, an advance in a ring.] n. a band of singers ख्रिस्ती देवालयांतील सेवाधारी गायकमंडळी f, उपासनागीत प्रमुखपणाने म्हणणारी गायकमंडळी f. [A CATHEDRAL CHOIR CONSISTS OF THE VICAR's .CHORAL OR MINOR CANONS, LAY-CLERKS, CHORISTERS. THIS BODY IS DIVIDED INTO TWO SETS OF VOICES SITTING IN THE SOUTH AND NORTH SIDES OF THE CHANCEL CALLED RESPECTIVELY DECANI AND CANTORIS WHO SING ANTIPHONALLY. BUT IN SOME CASES THE POSITIONS ARE REVERSED.] २ ख्रिस्ती देवालयांतील गाणाऱ्या मंडळीची जागा f, देवळांतील गायनस्थळ n. ३ arch. चान्सेल, कठड्यामुळे किंवा पडद्यामुळे देवळाच्या मध्यभागापासून भिन्न झालेला देवालयाचा भाग m. C. v. t. & v. i. एकत्र गाणे. Choir-organ n. ख्रिस्ती देवालयांतील प्रार्थनागीताबरोबर वाजविण्याचे वाद्य n. Cho'ral a. belonging to a choir गाणाऱ्या मंडळीचा, गायकगणासंबंधीं-विषयक. Choir-screen n. गायक मंडळीच्या स्थानापुढचा जाळीदार पडदा, कटिंजन m. Chor'ale n. भजनगीत n, कीर्तन n. Cho'rally adv. Choke (chok) [A. S. aceocian, to suffocate; Icel. koka, to gulp. ) v. t. to stifle, to suffocate, to strangle गुदमरून-घुसमटून टाकणे-मारणे, नाकतोंड दाबून-कोंडून-&c.-मारणे, नरडें n. नरडी f, गळा m &c. दाबणे or दाबुन मारणे, दम m. श्वास m. कोंडून मारणे. २ to hinder or check (as growth, progress, &c.) वाढ खुंटविणे, खुजट करणे. ३ to block up कोंडणें, बुजविणे, रोधणे. C. v. i. गुदम (मु) रणें, घुटमळणे, श्वास कोंडणे.