पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/679

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ ( esp. through violent emotion) ऊर m. दाटणं g. of s., गळा m. दाटणे or भरून येणे g. of s., गहिंवरणे, गहिवर m. येणे in con., घुसमटणे, सद्गदित होणे. Choked a. गुदमरलेला, श्वास कोंडलेला. Choke-damp कोळशाच्या खाणीत सांपडणारा विषारी वायु m, खाणीतील विषारी हवा f. ही प्राणवायु आणि कर्ब ( carbon ) ह्यांच्या मिश्रणाने होते. Chokeful a. आकंठ भरलेला, तुडुंब, कांठोकांठ, गळ्यापर्यंत, ओतप्रोत. Cho'ker n. दम-श्वास कोंडणारा. Cho'king n. श्वास-दम कोंडणें n. Chok'ya. दम करणारे. To choke off अंत करणे, नाश करणे. २ मध्ये अडथळा आगणे. To choke up पूर्णपणे प्रतिबंध करणे. २ दम कोंडणे, दावून टाकणे, गुदमरून टाकणे. White choker खिस्ती आचार्याच्या गळ्याभोवती असलेला पांढरा गलपट्टा m. चौकी f. Chokey ( cho'ki ) [Hind. चौकी.] n. बंदीखाना m. २ Cholagogue ( kol'a-gog) [Gr. chole, bile & agogos, leading, from agein, to lead.] n. u medicine to evacuate bile पित्तन्न-पित्तनाशक-पित्तशामक औषध n, पित्तरेचक n. Cholagog'ic a. Choler ( kol’er ) (Gr. chole, bile & rhein, to flow. ] n. पित्त. २ irascibility नमोगुण m, पित्तप्रकृति f, पित्तस्वभाव m. ३ राग m, कोप m, क्रोध m. Chol'eric a. पित्ताने भरलेला. २ पित्तप्रकृतीचा. ३ तापट, तमोगुणी, तामसी. ४ रागीट, क्रोधाचा, क्रोधी. Cholera ( kol'er-a) (Gr. & L. cholera, from chole, bile. कोलेरा हा पित्तातिशयामुळे होतो अशी जुनी समजूत होती, यामुळे हे नांव पडले आहे.] n. कालेरा m, हागओक f, बिसू-शु-पू-पत्रिका f. ( According to माधवनिदान), पटकी f, वाखा. [ Inveterate or longstanding C. पुष्कळ दिवस राहिलेली पटकी . Epidemic C. जरीमरी, महामारी, बाख्याची सांथ, पटकी, Spastmortink पायांत पेटके बळ आणणारी पटकी. To be affected with C. पटकीने-वाख्याने लागणे, पटकी-वाखा होणे. Biritish C. विलायतेत होणारी पटकी f. Asiatic C. एशियांत होणारी पटकी f. C. basoillus विषुकाजलु. Endemic C.सदोदितचा कोलरा. Cholera infantum or Cholera morbus मुलांना होणारा कालरा. spgradic Cholera तुरळक पटकी. (पटकीची - सांथ नव्हे.) Choltry ( chol'tri) n. प्रवाशांसाठी मुशाफरखाना, ओरी, धर्मशाळा f, सराई f. २ सभामंडप m. also Choul'try. Chondroid (kon'droid) (Gr. chondros, cartilage gristle, a grain & oid. a. कूर्चास्थिमय, कोमलास्थिमय. Chon'cirin n. कुर्चास्थीचा मुख्य घटक पदार्थ m. Chondritis n. कूर्चास्थीचा दाह-अभिताप m. Chondrogen'esis n. कुर्चास्थीची उत्पत्ति f. Chondrog'enetic a. Chondrog'raplay n. कुर्चास्थीचे वर्णन n. Chondrol'ogy n. कुर्चास्थीचे ज्ञान n, कुर्चास्थिशास्र n. Choose (chooz ) [ A. S. ceosan, to taste. ] v. t. to