पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/677

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरिकाम्लापासून झालेलें लवण n. Chlo'ric a. हर वायूपासून झालेला, हरिक. Chlo'ride n. हरिल n, हर वायु व दुसरी एखादी धातु किंवा सेंद्रियमूलक ( radical) यांपासून झालेले लवण n. Chlo'ridise ( incorrectly Chlorodize) v. t. हरिलाचे-क्लोराइडचें रूप देणे, हरिल करणे. Chlorite n. a salt of chlorous acid हरायित, हराम्लाचें लवण. Chlo'ritic a. हरायित (chlorite) संबंधों. Chlo'rous a. हर वायूपासून झालेला. Chlorodyne ( kloʻrõ-din, or klāʻrū-din) [From chlor, the first part of Chloroform & odyne, pain.] n. a drug popular as a narcotic and anodyne, composed of chloroform, morphia, tincture of Indian hemp, prussic acid and other substances क्लोरोडाईन नावाचे पोटदुखीवर व जुलाबावर इंग्रजी वैद्यकांतील औषध. हे बाजारांत' आयतें तयार मिळते. ह्यांत क्लोरोफार्म, अफूचे सत्व, प्रसिकाम्ल व इतर द्रव्ये असतात. Chloroform (kloʻrūform) [From chlor, part of Chloride or Chlorine and form, from Formic acid, from chemical connection. ] n. शस्त्रप्रयोग करतांना बेशुद्धि आणण्याकरितां हुंगण्यास दिलेलें औषध, क्लोरोफार्म, बेशुद्धि आणणारे औषध. Chlorometer ( klo-rom'êt-er ) [From chlor-part of Chlorine & Gr. metron, a measure..] n. हरमापक; हरवायुमिश्रित चुना, सोडा किंवा पोट्याश यांमधील हर ( chlorine ) मोजण्याचे उपकरण. Chlorom'etry m. हरमिति f, हरमापन n. Chlorophyll ( klo‘ro-fil) [Gr. chloros, light green & Phyllon, a leaf. ] n. पानांतील हरिद्वर्णद्रव्य n, रंजकद्रव्य n. Chlorosis (klori'sis ) [Gr. chloros, light green. ] n. med हलीमक, पंडुरोगाचा भेद, पित्तपंडू, नीरक्तता f, हरीतरोग m, ज्यांत रक्त कमी झाल्याने हिरवा रंग येतो तो राेग.m, रक्तन्यूनत्वामुळे स्त्रियांस येणारी पांडुरता f. Chlorot'ic a. Chock (chok) [O.Fr. cuche, a block of wood. ) v. t. (पाचरीनें-पाचर ठोकून) मजबूत-गच्च करणे. C.v.i. (पाचरीप्रमाणे) गच्च बसणे. C. n. पाचरवजा ठोकळा m, पाचर f, अडकवण n. २ डोळा m, बेचकें n, खोबण f. [BOAT-CHOCKS आगबोटीवर रक्षक होडी-देवी ठेवण्याचा बेचकासारखा ठोकळा m.] C. adv. संपूर्ण, पुरा. Chock'ful, Choke'full a. पूर्ण भरलेला; as, "Speeches C. of puerile insolence.” Chock'-tight a. घट्ट, मजबूत. Chocolate (chok'o-lat) [ Sp. chocolate.--Mex. chocolatl-Choco, cocon and latl, water.] n. एक काफीसारखें चाकोलेट नांवाचे पेय n, काही कृतीने क्याकाओफळ जाळून त्यापासून तपकिरी रंगाची चहाकाफीसारखी पिण्याकरितां केलेली पूड f. C. a. काळसर-तांबूस-पिंगट रंगाचा, धुपेली रंगाचा. Choice (chois) [O. E. chois.-O. Fr.chois.-Fr. choisir, to choose.] n. निवड f. [ TO MAKE C. OF निवड