पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/676

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pressed or afflicted) वः शस्रम्' हे क्षत्रियत्वाचे लक्षण कालिदासाने दिले आहे. “The unbought grace of life, the cheap defence of nations, the nurse of manly sentiment and heroic enterprise is gone." हे.वर्कचे Chivalry संबंधी उद्गार आहेत, तेव्हां क्षात्रधर्मातील व Chivalry तील साम्यावरून Chivalry ला आर्तंत्राणधर्म, क्षात्रधर्म हे प्रतिशब्द योग्य आहेत असे आमचे मत आहे. मध्ययुगीन इंग्लंडांतील नाइट लोकांना गरिबांचें-दुबळ्यांचें-स्त्रियांच्या पातिव्रत्याचे रक्षण हेच आपलें पवित्र कर्तव्य असे वाटत असे व त्याकरितां ते प्राणाचीही बिलकुल पर्वा करीत नसत.] n. (in the Middle Ages) (a) युद्धास तयार अशी अश्वसेना f, आर्तत्राणव्रताची अश्वसेना f; (b) स्त्रीशुद्धीकरितां प्राण देणारे शूर लोक, स्त्रियांचा आदर असणारे शूर लोक; as, " And Belgium's capital had gathered then her beauty and her chivalry, and bright the lamps shone over her fair women and brave men." २ पीडितरक्षणधर्म m, आर्तत्राणधर्म m, आर्तत्राणव्रत m, क्षात्रधर्म m, मर्दुमकी f, पौरुष n, वीरता f, शौर्यशालिता f, पराक्रम m, सरदारबहादरी f. 3 the knightly system of the feudal times पीडितांचे रक्षण करणारी सामंतसंस्था f, राजापासून नोकरीबद्दल जमीन घेऊन सदोदित शिपाईबाण्याने राहणारी मंडळी f. ४ हृदयाचा किंवा मनाचा थोरपणा m. Chiv'alric, Chir'alrous d. pertaining to chivalry. See the meanings of the noun and form adjectives. therefrom. Chiv'alrously adv. आर्तत्राणधर्माने, सरदारी बाण्याने, क्षत्रियबाण्याने, &c. Chiv'alrousness n. Chive (chiv) [Fr. cive, from L. cepa, ccep an onion.] n. pl. (R.) bot. केसर n. २ (also cive) agric. एक प्रकारचा कांदा m. Chivy, Chevy (chiv'vi, chey'vi) n. शिकारीची आरडा ओरड f. २ शिकार f, पारध f. C. v.t. शिकार पारध करणे. C.v.i. पळ काढणे, पोबारा करणे. Chlamys ( klaʼmis or klam'is ) [Gr. chlamys, chlamydos, a garment.] n. क्लामिस m, प्राचीन लोकांचा पोकळ व आंखूड झगा m. Chlam'ydate a. झगा असलेला. २ (गोगलगाईसारखें) पाठीवर कवच असलेला. Chloral (klöʻral) [From chlor, the first part of Chlorinc & al, the first part of Alcohol, व्यवहारांत याला क्लोरल हायडेट' असें म्हणतात.] n. 'क्लोरल' किंवा 'क्लोरल हायडेट' नांवाचें झोप-गुंगी आणणारे अेोषध n. हे 'हर' (chlorine) नांवाच्या मूलद्रव्याचे व मद्यार्काचे मिश्रण करून तयार करतात. हे पोटांत गेल्यावर रक्तांत मिसळतें व शरिरांत क्लोरोफार्म तयार करते. (CCI. s CH.2,OH ) ही याची रासायनिक घटना आहे.

Chlorine (kloʻrin) (Gr. chloros, greenish yellow, its colour.] n. रसायनशास्त्रांतील 'हर' नांवाचे हे हिरवट पिवळ्या वर्णाचे असते व कपड्याचा रंग, दुगैंधि, इत्यादि हरण करिते; हे वायुरूप आहे व हवेपेक्षा अडीचपट जड असते याचा ओपकामांत बराच उपयोग करितात. Chlo'rate n. a. salt of chloric acid हरित,