पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/597

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गीच्या पाठीमागचें तोफघर f, जंगाच्या पाठीमागची तोफा ठेवण्याची किंवा माणसें उभी राहण्याची सुरक्षित जागा f. Casern (ka-sern') [Fr.-L. casa, a hut.] n. a lodging for soldiers in garrison towns, usually near the rampart तटालगत आंत शिपायांची आसऱ्याकरितां राहण्याची जागा f. Cash (kash) (Fr. casse, case, box, cash-box, cash.) n. रोकड f, नगद f, n, नगदी f, दाम m, सोनेनाणे n, colloq. रोख or रोकड, रोकड पैसा m. २ (obs.) तिजोरी f. C. v.t. (note, bill, &c.) रोकड दाम करणे, वटावणे, मोडणे, टक्के करणे. Cash-account n. रोकडीचा हिशेब m, रोकडीचा व्यवहार m. Cash-credit n. (पेढीवरून) रोख पैसे उचलण्याची पत f. Cash-book n. रोजकीर्द, रोजमेळ, रोकडवही. Cashier n. रोख पैसे वांटणारा m, सराफ. Cash-keeper n. खजीनाकारकून m, खजिनदार m, जामदार (*) m, पोतनीस (*) m, किल्लीदार (*) m, रोख पैशाचा हिशोब ज्याकडे असतो तो मुनीम m. [PRIVATE C. खासगीवाला.] Cash-payment n. रोख पैसा देणे n. Hard Cash रोख नाणे. Out of Cash रोकड पैशाशिवाय. In cash रोकडीच्या रूपांत-नें. Ready cash रोकड. Cash-boy दलालाने गि-हाइकांकडन गोळा केलेले पैसे खजीनदाराकडे नेणारा नोकर. Cashing pr. p. Cashed pa. p. N. B.Treasurer खजीनदार ; Cashier सराफ, जामदार, पोतनीस, आणि किल्लीदार हे मराठेशाहीत निरनिराळे दर्जाचे अधिकारी होते. तेव्हां हे शब्द Cashier, किंवा Cash-keeper ह्या शब्दांना योग्य प्रतिशब्द होणार नाहीत. Cash (kash) m. चिनी लोकांचें एक तांब्याचे नाणे n. Cashew (ka-shõõ') [A corruption of Fr. from Malay karyu tree.] n. a tree काजू f, काजूचे झाड n. २ an apple or nut, (C. apple) pulpous portion बोंड n, (काजूचे) बोंड n, काजूगोळा m. Cashew-nut n. काजू, काजूगोळा. N. B.-काजूला कोठे कोठे जांब असेही म्हणतात. Cashier ( kash-ēr') [Fr. casser, to break, to annul, from L. cassare, to annul.] v. t. to dismiss from am office for bad conduct बडतरफ-बरतर्फ करणे, स्थानभ्रष्ट-स्थानच्युत-पदच्युत-पदभ्रष्ट-&c. करणे, नोकरीवरून काढून टाकणे. २ लक्षात न घेणे, सोडून देणे, वेगळा करणे; as, "They absolutely C. the literal express sense of the words." ३ रद्द करणे. Cashierer n. (R.) बडतरफ करणारा. Cashiering n. Cashierment n. बडतरफी f, रजा f. Cashmere (kash'mēr) [From Cashmere in India] n. a rich and costly shawl काश्मीर देशांतील लोकरीची उंची शाल f, काश्मीरी शाल f. Also Cashmere shawl. Casings (ki'singz) m. pl. गोवऱ्या, शेण्या.

Casino (kas-e-no) [ It. casino, a small house.-L. casa, a cottage.] n. pl. Casinos. a small countryhouse खेड्यांतली बंगली. २ a building or saloon