पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/593

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निराळ्या अर्थात काही ठिकाणी 'स्थानांतर' ही कल्पना उत्कट आहे व कांहीं टिकाणी 'आधार' ही कल्पना उत्कट आहे. To carry ह्याच्या कोणत्याही अर्थात एक कल्पना उत्कट असली म्हणजे दुसरी कल्पना तेथे नसतेच असे नाही; परंतु तेथे ती तितकी उत्कट नाही असा अर्थ समजावयाचा. आमचे म्हणणे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल: ९, " Do not. leave the carpet-bag here; carry (take ) it upstairs. Do not drag it along the floor, carry it." Curt ( kart) L. [carrts, a car.] n. गाडा m, खटारा m, गाडी, dim. गाडली (obs.) & गाडलें ( in contempt), छकडा m, शकट m, रेंकला m, रेडू (?) m, रेडका (?) m. [BOTTOM OF A C. साटी OR साठी f. CHILD's Go-C. पांगुळगाडा m, पांगुळगाडी f.] २ किरकोळ वस्तु विकण्याची लहान गाडी f. ३ दोन चाकांची सहल करण्याची व विनझांकणाची गाडी f. C.v.t. गाड्यांत-गाडींत नेणे-वाहून नेणे. २ शिक्षेदाखल गाडीतून धिंड काढणे; as, " She chuckled when a bawd was carted." C. v. i. गाडी वापरणे, गाडीवाल्याचा धंदा करणे. Cartage n. मालनेणावळ f. २ माल नेणे n. Carter n. गाडी हांकणारा, गाडीवान. Cart-grease n. ओंगण, वंगण. Cart-horse गाडीचा घोडा m. Cart-house n. गाडी ठेवण्याकरितां केलेली सावली-छपरी f. Cart-load गाडीचे भर ओझें. Cart's tail n. गाडीचा मागचा भाग. Cart-rope n. नाडा m, मणदोर. Cart-rut च-(चा)कारी. Cart-way-road गाडीरस्ता. Cart-wright गाड्या करणारा सुतार, गाड्या बांधणारा सुतार. T.-Cart चौघांस बसता येईल अशा प्रकारची चौचाकी गाडी, हिचा आकार T. अक्षरासारखा असतो. Dog-cart 'डागकार्ट', एक दुचाकी गाडी f, हौशी लोक प्रथम आपले खेळाडू कुत्रे यांनून नेत असत. Mail-cart टपालाची गाडी. २ लहान मुलांची गाडी. To put the C. before the horse वस्तुस्थितीचा विपर्यास करणे, वस्तुस्थितिविरुद्ध एखादी गोष्ट करणे. Village cart गांवढ्यांतली गाडी, एकच मनुष्य नेणारी अशी उघडी सखल एका घोड्याची दचाकी गाडी. White chapel cart or Chapel cart खाटीक लोकांची गिहाइकांना मांस पोचविण्याची दुचाकी हलकी कमानीची गाडी f. Carting pr. p. Carted pa. t.

Carte ( kärt) [ Fr.-L. charta, a paper.] n. a bill of fare at a hotel खाणावळवाल्याचे बील n- आकारपत्रक n, खाणावळीचा आकार m. २ Short for carte-decisite कार्डाच्या आकाराचा प्रकाशलेख m. (ह्याची लांबी साडेतीन इंच व रुंदी सव्वादोन इंच असते.) Carteblanche n. blane paper कोरा कागद. २ 'a blank paper given to any one on which to write his own conditions' पूर्ण अखत्यारसूचक कोरा कागद m. (ह्या कोऱ्या कागदावर अखत्यार देणाराची सही केलेली असते.) ३.fig.full discretionary powers granted कुलअखत्यार m, पुरा-पूर्ण अखत्यार m. Carte-de-visite'n. pl. Cartes-de-visite. Cartel n. mil. लढाईत पाडाव केलेल्या शिपायांची अदलाबदल करण्याचा करारनामा m. २ सलोखापन्न n. ३ . a written challenge, a letter'