पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/592

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिरावणे , हरणे, नेणे, हरण करणे g. of o. २ पटकावणे; as, He carried away all prizes. To C. by storm दणकाऊन जय मिळविणं. 'To C. curls to Newcastle, see Coal. To C. fire in one hand and water in the other बोलावयाचं एक व करावयाचे भलतंच, स्तुति करून फसविणे, जास्त नुकसान करण्याकरितां संशय दूर करणे, lit. एका हातांत आग व दुसऱ्या हातांत पाणी नेणं, विझवण्याची हल दाखवून आग लावणे. To C. off दूर नेणं. २ हरण करणे. ३ जगांतून नेणे; as, The plague carried off thousands. ४ पटकावणे ; as, To C. off prizes or honours. ५ to bear it out, to brave it out सोसणे , (शी) माथे-टक्कर f. मारणे, (संकट इत्यादि) साहणे. To.C. it off to cause to pass, to take away the averse effect of (चा) आनिष्ट परिणाम नाहींसा करणे, झांकणे, झांकण्याचा प्रयत्न करणे ; as, " A rapid intellect and ready eloquence may carry off a little impudence." To C. on पुढे चालवणे, चालू ठेवणे, वहिवाटणे(?), निर्वाहणे.(?). To C. one's point उहिष्ट गोष्ट-हेतु-मुद्दा तडीस नेणे, अभीष्ट मिळविणं. To C. out बजावणे, अमलात आणणे. २ सिद्धीस-शेवटास नेणं. To C. out one's bat चेंडूफळीच्या खेळांत गडी वाद न होऊन त्याने (विकेट) उभ्या काठ्या सोडून जाणे. To C. over' पुढे नेणे. To C. through तरीपार करणे , पुरे करणे, निस्तरणे , निस्तारणे , निर्वाह करणे. To C. the day or C. it जय मिळविणे, पैज जिंकणे. To C. too far योग्य मर्यादेचा अतिक्रम करणे. To C. up बांधकाम अमुक एक उंचीपर्यंत नेणे, वर चढवणे. To C. weight (चं) वजन असणे. २ (R) लटंबर-वजन नेणे; as, "He carries weight, he rides a race.” C. v.i. वाहणे, नेणे, वाहकाचे काम करणे. २ पुढे ढकलणे, पुढे नेण्याची शक्ति असणे, पुढें फेकण्याची शक्ति असणे. ३ (कमानदार मान करून) डाेके उंच उभारणे. Carry-all n. चौचाकी हलकी एका घोड्याची गाडी f. Carried (v. V. 1.) वाहलेला, नेलेला, &c. [To BE C. AWAY (चें) डोके भडकृन जाणे, मनाचा तोल जाणे.] Carrier n. नेणारा, वाहक, वाहणारा, ओझें नेणारा, ओझील m, हमाल m, भारवाहक, भारवाही, भारवाह. २ निरोप नेणारा. ३ भाडे घेऊन माल गाडीत नेणारा. ४ चरकी लावण्याच्या दागिन्याला पकडून फिरविण्याचे साधन n, चरकीवरील दागिन्याचा वाहक. ५ बंदुकींतील काडतूस उडविण्याकरितां नळींत भाग्य ठिकाणी ते आणून लावणारा कुत्रा m. Common carrier सार्वजनिक वाहक m, ठरीव भाडे देणाराचे ओझें पाहून नेण्याची कायदेशीर जबाबदारी पतकरणारा भाडेकरी. रेल्वे-टाम्वे-टांगे यांचे मालक सार्वजनिक वाहक आहेत. Carrying a. Currying trade or traffic जलमार्गाने होणारा व्यापार.

N. B.-To carry ह्या क्रियापदाचा मूळ अर्थ उचलुन गाडीत एक ठिकाणाहून दुसरे ठिकाणी नेणे, असा आहे. म्हणजे आधार आणि स्थानांतर ह्याच दोन मूळ कल्पना To carry ह्याच्या अर्थात आहेत. तेव्हां वर दिलेल्या To carry शब्दाच्या निर.