पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/525

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Candle. To measure other people's corn by one's own bushel ef. आपल्यावरून जग ओळखणे-ताडणे.
Business (biz'nes ) [A. S. bysgian, bysig, busy. ]n. employment, occupation काम m, थंदा m, व्यवसाय m, उद्योग m, कसब (?), व्यापार m, उद्यम m, व्यवहार m. २ works to be done काम , कामगत (R) कामगिरी कारभार m, कामकाज n, कामकारभार m, कामधंदा m. [Mind your own B. आधी आपल्याच कामांत पुरें लक्ष घाला, तुला काय पंचाईत, तुझे काय जाते, तूं आपलें घर संभाळ, नसती उठाठेव तुला कशाला पाहिजे, अव्यापारेषु व्यापार कशाला हवा]. ३ a job, a matter to be done काम n, कार्य n, काज n, कर्तव्य n, प्रयोज्य n. [LIGHT OR EASY B. क्षुल्लक काम n, idio. अगदी सोपें काम n, हातचा मळ m. LOSING B. बुडता धंदा, बुडीत व्यापार, बुडस्थळ. TROUBLESOME B. बखेडा m, लचांड n, लटावर n, भानगड f, उपद्व्याप m.] ४ a matter gener. an affair गोष्ट f, मुकदमा m, खटला m. or खटले n, गाणे n. ५ province, office काम n, स्वकर्म n. idio., स्वधर्म idio., प्रकरण n, हक m, टप्पा m, मान m, अरुता (?)f, अरू (?)f. ६ traffic उदीम m, घेणेदेणे n, घडमोड or घडामोड f, देवघेव f, व्यापार m. [EXTENSIVE OR VAST B. मोठा कारखाना m, अलायी-लंगर-ब्रह्मांड&c. कारखाना m, फापटपसारा m, फाकडपसारा m, कामाचा परगणा m, मोठा व्यापार m, मोठी देवघेव f, मोठी उलाढाल f. DEPARTMENTS OF AN EXTENSIVE B. अठरा कारखाने m. pl. MAN OF B. व्यवहारी, pop. वेव्हारी m, उद्योगी, उद्योगाचा पुतळा, उलाढाल करणारा, देवघेव चालविणारा, व्यापारी. SKILLED IN B. व्यवहारदक्ष, कुशल, व्यवहारपटु. To THRIVE IN B. दुकान . वाढणे g. of s., धंदा भरभराटीस येणे, व्यापारास चढती कळा येणे-चलती असणे.] ७ bustle and stir of buyers and sellers गिऱ्हाईकी f. ८ profession, art, vocation, Occupation रोजगार m, कसब n, व्यवसाय m, वृत्ति f, व्यवहार m, उद्योग m, धंदा m. Business a. कामधंद्यासंबंधी. Business-like a. (कामदार मनुष्याच्या) टापटिपीचा, व्यवहाराचा, व्यवहाराला अनुसरून, शुद्ध व्यवहाराचा. To do the business for सोक्षमोक्ष करणे, निकाल लावणे. २नाश करणे. To make it one's business स्वकर्तव्यबुद्धीने करणे, आपलेच काम ह्मणून एखादी गोष्ट काळजीपूर्वक करणे. To mean business खरी खरी व्यवहारबुद्धि असणे, खरी खरी कार्यबुद्धि असणे, उगाच वेळ काढण्याचा हेतु नसणे. To mind one's own business आपल्या स्वतःच्या कामाकडे लक्ष्य देणे, दुसन्याच्या भानगडीत न पडणे. To send one about one's business हाकलून देणे, (एखाद्याला) त्याच्या स्वतःच्या कामावर जावयास लावणे.
Buskin (buskin) n. प्राचीनकाळांतील नटांचा जोडा m, उंच टाचेचा गुडघ्यापर्यंतचा जोडा m. २ पूर्वकालीन इंग्लडांतील शोकपर्यवसायी नाटकांतील पात्रांचा मोठा जोडा. ३ (R.) शोकपर्यवसायी नाटक. Buskined a. बस्किन जोडा घातलेला, बस्किन जोड्याने तुडवलेला.