पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

beyond one एखाद्याच्या आटोक्याबाहेर असणे. To go beyond (करामत, शोध इत्यादिकांत) ताण करणे, वरचढ करणे, मागे टाकणे, मागसांडणे, कान m. Pl. कापणे. २ (व्यवहाराचे ठरीत नियम) उल्लंघणे; as, "That no man go B. and defraud his brother in any matter." B. adv. yonder पलीकडे. Bezant (bezant') n. तुर्कस्थानांमधील एक सोन्याचें नाणे n. याची किंमत दहा शिलिंग किंवा वीस शिलिंग असते. हे नाणे रुप्याचेही आहे, 'बेझान्ट.' Bezel, Bezil (bez'el) n. कोंदण n ", घरं n. २ तासणीच्या पानाच्या धारेजवळचा निमुळता भाग m, तासणीच्या पानाची निमुळती धार f. ३ (as of a watch) (कांच बसविण्याची) खांचदार कडी f, कांचकडी f . Bezique (be-zek') [Fr. besigne, a game at cards.] n. एक प्रकारचा पत्त्यांचा खेळ m, विझिक n. ह्यांत दोन, चार किंवा सहा असे इसम खेळतात व दोन किंवा चार पत्यांचे जोड घेतात. Bezoaz (bēʻzõr) [O. Fr. bezoar-from Pers. pauzahr pad, dispelling & cahr, poison.] n. बकरें, काळवीट इत्यादिकांच्या कोठ्यातील दगडासारखा पदार्थ m. हा विपन्न आहे. २ कोणत्याहि रोगावर औषध n, विषन्न औषध n, विषाचा मोहरा n. Bovine B. गोरोचना f, गोरोचन n, गोवर्धन n. Bezonian (be-zõn'ian) [It. besogni, from besogno, need] n. (shakes.) हलकट मनुष्य m, भिकारडा मनुष्य m.Bhang (bang) [SK. भंगा , bhang.] n. भांग f, गांजा m. _ Bhystie, Bheestie (bhiste) [Per. bhyst, heaven.] n. भिस्ती m. (पखालींतून पाणी नेणारा).

Bi (bi) pref. दोन. २ दोनदां. ३ दुप्पट. 

Biacid (bi-as id) n. न्यम्ल. Biangular, Biangulate (bi-ung'gū-ler,-lāt) a द्विकोण,दोन कोंपऱ्यांच , दुकोनी. Biantheriferous (bi-an-therit'erus) a. दोन केसरग्रंथी असलेला, दुकेसरग्रंथी. Biarticulate (bi-är-tik'u-lāt) a. [ sec Articulate.]soul. द्विसंधिक, दोन सांधे असलेला, दुसांधी. Bias (bi'as) [Fr. biais, a slope, -L. bi, double & facies, the face.] n. (पेल्यांच्या खेळांत पेल्याच्या) एका बाजूला ठेवलेले वजन n. ह्या वजनाने पेल्यांची गति सरळ रेषेपासून कलती होते; as, “ Being ignorant that there is a concealed bias within the spheroid, which will swerve away." Sir W. Scott. 2 वांक m, कल m, ओढा m, वळण n . ३ पक्षपात m. ४ त्रिकोणाकार कापडाचा तुकडा m, कपड्याची कळी f. B. v. t . वळविणे, वांक देणे, वळण देणे, झुकविणे, तोलविणे, झोंक m, तोल m- कल m- वळण n- देणे. २ एकाच बाजूला मनाची प्रवृत्ति करणे. Biased or Biassed p.p. Biasing n. एका बाजूला वळणे , पक्षपात करणे n.

Biauricultate (bi-awriku-lat) a. (हृदयाला) दोन ऊर्ध्वशय असलेला, अर्धाशय (a. (sec Auricle.) 

Biaxinl (bi-aksi-al) a, दोन आसाचा. Also Bioxal,