पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1996

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बेहद्द, अनेमस्त, सीमेबाहेर गेलेला, अपरिमित, अतिरेकी. Inordinacy n. excess or want of moderation of दातिकम m, अमर्यादा, बेहद्दपणा m, बेहद, अपरि. मितपणा m, अतिरेक m. Inordinately adv. मर्यादातिक्रम करून, बेसुमारपणाने. Inordinateness, Incoordination n. deviation from rule, irregularity अमर्यादता f, नियमोल्लंघन n, अनियमितपणा m अतिरेक m.
Inorganic ( in-or-gan'ik ) a. without life or organization (as minerals ), unorganized, lifeless, inanimate जड, अचेतन, निर्जीव, चैतन्यरहित, चैतन्यशून्य, इंद्रियरहित, निरिंद्रिय; as, "I. matter." २ pertaining to the department of unorganized substances जडपदार्थविषयक, जडपदार्थीविषयींचा, निरिंद्रियवस्तुविषयक; as, "I. chemistry' = निरिंद्रियर सायनशास. See under Chemistry.
Inosculate (in-os kā-lat ) [ L. in, and osculor-atum, to kiss.] v. i. to unite by mouths or ducts ( as two vessels in an animal dy ), to blend एकमुखी होणे, एकवाहिनीरूप होणें. I. v.t. to unite by contact ( एकमेकांशी ) सांधणे, संयोग करणे, जोडणे, (एकमेकांला) संयुक्त करणे मिळवणे, भिडवणे. २ to unite intimately, to cause to become one (-चा) संबंध जोडणे लावणे. Inosculation n. एकमुखीभवन n, एकमुखीकरण n, अग्रद्वयसंधि m.
Inquest (in kwest) [ O. Fr. inquests; See Inquire. ] n. an inquiry, search, quest चौकशी f, तपास m, तलास m, शोध m, विचारणा f, माग m, छडा m, सुगावा m, कयास m. २ an official inquiry सरकारी चौकशी f तपास m. ३ a jury, particularly a coroner's jury मैयतकयास, कारोनरची जूरी, (अपघातामुळे ) मयत झालेल्या माणसाच्या प्रेताची चौकशी करणारी जूरी f. ४ अपमृत्यूची पंचमार्फत चौकशी f, अपमृत्युविचारणा f.
Inquietude ( in-kwi'et-ūd) n. disturbance or uneasiness (of body or mind) अस्वास्थ्य n, अस्वस्थता f, अशांति f, स्वास्थ्याभाव m, (शारीरिक) बेआरामी f; प्रास m, पीडा f, आधि f, व्याधि f, खुतखूत f.
Inquire (in-kwir')[L. in, & quartere, equisetum, to seek.] v. i. to ask a question or questions, to seek for truth by putting queries (माहिती मिळविण्यासाठी) प्रश्न विचारणे, खबर माहिती पुसणे, प्रश्न करणे -घालणे. २ to make examination or investigation चौकशी करणे, तपास तलास करणे. [To I. INTO तपासणे.] I. V. t. to ask about (-ची) चौकशी करणे, माहिती विचारणें -पुसणे, (चें) वर्तमान हकीगत वृत्तांत विचारणे, खबर -समाचार घेणे. Inquirer n. विचारणारा, पुसणारा, प्रश्न-पृच्छा करणारा, पृच्छक, प्रष्टा, जिज्ञासु, अन्वेषक. २ शोधक, परीक्षक, विचारक, शोध करणारा, वर्तमान विचारणारा, तपास घेणारा लावणारा कर. णारा, शोधकर्ता. [ I. AFTER TRUTH सत्यशोधक.]. Inquiring pr. p. given to inquiry, curious चौकस,