पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1995

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंधक रस (लस) आंगांत (टोचून) घालणे, (रोगप्रतिबंधक) लसिकाधान करणे; (with the matter of small-pox) देवी काढणे टोचणे, फोड्या काढणे, तोडगा करणे, शिक्का देणे, छापणे. ३ (fig.) to introduce into the mind ( used esp. of harmful ideas or principles to imbue (वाईट गोष्टी) मनांत भरविणे; as, "To I. on with treason or infidelity." I. v. i. कलम करणें बांधणे. २ देवी काढणे -टोचणे. N. B.:--The use was formerly limited to the intentional communication of the small-pox, but is now extended to include any similar introduction of modified virus. Inoculation n. (the act.) कलम बांधणें n, पिबंदी f. २ लसिकाधान n, लसिकानिवेशन n, रोगप्रतिबंधक रस टोचून आंगांत घालणें n, इनॉक्युलेशन करणे n. (b) loosely देवी काढणे n -टोचणें n ३ (fig.) communication of principles (esp. false principles) to the mind (वाईट गोष्टी भरवून) मन बिघडविणे n. Inoculator n. रोगप्रतिबंधक लस भांगांत टोचून भरणारा, इनॉक्युलेशन करणारा, लसिकाधानकार. Inodorous ( in-o'dur-us ) a. having no smell, scent les8 वासरहित, गंधरहित -हीन, गंधशून्य, निर्गध.
Inoffensive (in-of-fen'siv) a. giving no offence अनुपद्रवी, अनुपद्रवकारी, अनुपदविक, नम्र, लीन, विलीन, अहिंसक, अघातुक, अद्वेष्टा, अद्रोही, निद्रोही. २ harmless, doing no mischief or injury निरुपद्रवी, अनपकारी, अबाधक, गरीब, बापडा or बापुडा, बापुडवाणा, सात्विक, सालस, साळसूद, and appellatived terms for an inoffensive person are: भोलानाथ, भोलाशंकर, भोळानाथशंकर, सांब, सांबमूर्ति, धर्मराज. Inoffensively adv. गरिबीने, निरुपद्रविपणाने. २ सात्विकपणाने, सत्ववृत्तीने. Inoffen'siveness m. निरुपद्रविपणा m. २ सात्विकपणा m, सत्वशीलपणा m, सत्ववृत्ति f.
Inofficial ( in-of-fish'al ) a. not proceeding from the proper office, not required by the duties of any office हपीसाच्या मार्फतीचा नव्हे असा, हपीसाच्या द्वारे न झालेला, सरकारी नात्याचा नाही असा, अनधिकारक, अनधिकारप्रयुक्त. २ without the usual forms of authority अनौपचारिक रीतीचा, अधिकारचिन्हांशिवायाचायचा. Inoffic'ially adv.
Inoperative (in-op'er-a-tiv ) a. producing no effect निरुपयोगी, अकार्यकारी, व्यर्थ, कुचकामाचा; as, Laws rendered inoperative by neglect. Inopportune (in-op-por-tin' ) [ Fr. -L. in, not, & Opportune.) a. unseasonable in time, inconvenient अकालिक, भवेळींचा, अवेळेचा, अकाळींचा, अनवसर, अयोग्यकालिक, सोयीच्या वेळी न झालेला केलेला, अकालीन, अकाल, अयोग्य, भप्राप्तकाल. Inopportunely adv. भलत्याच काळी, गैरसोयीच्या वेळी, अयोग्य काली. Inopportuneness n. अकालिकता f, असमय m.
Inordinate (in-or di-nat) a. beyond usual bounds, immoderate, irregular अमर्याद, बेमर्याद, बेसुमार, 128