पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1957

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

credibility n. अविश्वसनीयता f, आविश्वासपात्रताf,आविश्वासार्हताf. Incredibly adv. अविश्वसनीयपणाने.
Incredulous (in-kred'a-lus ) a. hard of belief एकदम विश्वास न ठेवणारा, अश्रद्धावान्, शंकाशील, शंकेखोर. Incredulity n. अश्रद्धाf, अश्रद्धाळूपणा m, शंकेखोरपणा m. Incredulously adv. अविश्वासाने, अश्रद्धेनें, शंकेखोरपणाने, &c.
Increment (in'kre-ment) (L. incrementum in.cresco. See Increase.] n. the act of increasing or becoming greater वाढणे n, वृद्धि पावणे n. २ growth वाढf, वृद्धिf, वर्धन n, वाढा or वाढवा orवाढावा m, भरf, math. वृद्धि f,चय m.
Increscent (in-kres'ent) [L, in and Crescent. ] a. increasing वर्धनशील, वाढणारा, वृद्धि पावणारा.
Incriminate (in-krimir.at) [L. in in, & criminare to accuse one of a crime. ] v. i. to accuse, to charge with a crime or fault,to criminate दोषारोप करणे , दोष ठेवणे, (अपराधाचा आरोप आक्षेप करणे. Incriminated pa. t. and pa. p. Incriminating pr. p.दोष ठेवणारा, आक्षेपक, आक्षिप्त. [ Incrimina ting article आक्षिप्त किंवा आक्षेपार्ह लेख m, आरोपविषयक आरोपाचा लेख m.]. Incrimination n. दोषारोपm, दोषाक्षेप m. Incriminatory a. दोषाचा, आक्षेपाचा, आक्षेपक्षम, आक्षेपणीय.
Incrust (in-krust') [Fr. -L. incrust-o, -atus .in, on and crusta. See Crust. ] v. t. to cover with a crust or hard case (वर) पोपडा m, -पापुद्रा m -पुट कवच चढविणे, किटवणे, सपुट सकवच -पुटयुक्त करण. I.v.i. (-वर) पापुद्रा -पोपडा &c. धरणे बांधणे जमणे. Incrustation n. -the act. पापुद्रा बांधणेn . (b) थर चढविणे n बांधणे n. २a crust or layer of anything on the surface of a body थर m,पापुद्रा m, पापडा m, पोपडा m.
Incubate ( in'kū-bāt ) (L. incubo, -atum -in, upon, & cubare, to lie down. ) v. i. & v. t. to sit on eggs to hatch them अंडीn. pl. उबविणे, अंड्यांस उब देणे, "अंडउबारा करणे. २ to develop (as a disease &c.) रोगबीजें कृत्रिम उपायाने उबणे पिकणे. Incubation n. the act.अंडी उबविणे n.२ med. the period between the implanting of a disease and its development शरीरांत स्पर्शजन्य विषाचा फैलाव होऊन रोगचिन्हें दिसावयास लागणारा वेळ m, रोगबीजपोषणकाल m, उत्पादनकाल m.[PERIOD OF I.शरीरांत रोगोत्पादक वीज शिरल्यापासून त्यामुळे होणान्या (उद्भवणा-या) रोगाची चिन्हें दिसू लागेपर्यंत लोटणारा काळ m, अधिशयनकाळ m.] Incubator n. a. machine for hatching eggs by artificial heat कृत्रिम उष्णतेने अंडी उबवून ती फोडण्याचे यंत्र. २ रोगाची अंडी कृत्रिम रीतीने तयार करण्याचे पेटीसारखें यंत्र n, अंडपोषणयंत्र.
Incubus( in ku.bus) [ L. incubus, a nightmare.] n. a sensation during sleep as of a weight lying on