पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1783

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कठीण, अवघड, मुष्किलीचा, दगदगीचा, दुष्कर, दुःसाध्य;as, "A H. task." (e)(-to bear) कठीण, दुःसह, असह,कडक, कडकडीत, जबर; as, "H. winter; H. terms, H. times." (d) (-to control) कठीण, अनिवार्य,दुर्धर, जवरदस्त, प्रबळ; as, "The stag was too H. for the horse." (e)(to please or influence) obdurate, unfeeling, cruel कठीण, कठोर, निर्दय, निष्टुर, परुष, पाषाणहृदय, (दुसण्याचे) शहाणपण चालू न देणारा; as,"A H.master or character."२ unjust, oppressive कठीण, गैरवाजवी, जुलसी, जुलमाचा. ३ rough ( us food ), sour (as liquors) जाडा, भरडा, जाडा भरडा, रुक्ष, रुखा, कडक, आंबट, तल्लख (मद्य). ४ ( Pron.) (said of certain consonants, as c in come) कठोर (ध्यंजन). ५ harsh कठोर, कर्णकटु; as, "A_H. tone." H. coal कठीण कोळसा m. H. and fast bout. न हालेसें, जमिनीशी (पाण्याच्या तळाशी) लागून बसलेलें. H. lines कठीण प्रसंगm दिवस m. pl. H. money coin or specie रोकडf, नाणेn, रोख पैसा m. H. pan (fig:) the fundamental part of anything आधारभूत गोष्टf, पाया m. H. water chem. water which contains lime or some mineral substance rendering it unfit for washing जड किंवा कठीण पाणी, कठिनजल n. In H.condition en excellent condition for racing ( said of race horses) शर्यतीला योग्य लायक, कडक, तल्लख. H. adv. with urgency, diligently मेहनत करून,कष्टाने, आया. सार्ने, मोठ्या प्रयासाने, श्रमाने, सेहनतीनं,शिकस्ती, काळजीपूर्वक, जीव लावून तोदन.२ with difficulty मोठ्या मुष्किलीने, कसाबसा, कष्टाने, कसातरी,प्रयासाने, ढकलत ढकलत; as, "The vehicle moves H.३ so us to raise difficulties अडचण उपस्थित करणारा करण्यासारखा; as, "The question is H. set.” ४ violently, vehemently,(hence) rapidly झपाटून,अपाव्याने, सपाटून, सपाट्याने, जोराने, रगडून, सोसाट्याने, बदम, बेसुमार, जलदीने; as, "To rain or run H." [To KEEP H.AT ताणणे, चरकी-चरकावर धरणे.] ५ close,near जवळ, नजीक, संनिध, पाशी, लगत. H. BY अगदी जवळ, जवळच, हाताशी, कानाशी.] H. pushed or run (for money ) (पैशासंबंधी) तारांबळ झालेला, धांदल उडालेला, गालण झालेला -उडालेला. H. up निकडीत, पंचाइतींत, अडचणींत, प्रसंगांत. To die H.to die only after a desperate struggle For life निरुपाय होऊन धडपडून धडपडून मरणे. H. n. a ford or passage across a river or swamp (नदीतून किवा दलदलीच्या भागांतून पलीकडे) उतरून जाण्याची वाट f, उतार m. Harden v.t.to make hard or harder कठीण -बळकट-मजबूत-घट्ट-दृढ सुदृढ करणे, घट्टपणा आणणे, गोठवणे. २ to strengthen, to inure बळकट घट्ट -सुदृढ करणे, घटवणे, बनवणे, तयार करणे, (-ची) संवय लावणे.३ to confirm in wickedness नितंज-कोडगा बनवणे: