पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1782

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे, कष्ट श्रम देणे. २ (esp.) to weary by importunity बंजार करणे, जिकिरीस आणणे, सतावणे, भंडावणे, सतावून -भंडावून सोडणे, नको नको -पुरेसें करणं, पिच्छा पुरविणे, छळणं. ३ to annoy or torment (an enemy) (शत्रूवर वारंवार व अकस्मात् घाले चालून) जेरीस आणण, गांजणं. Harassed pa. t. and p.p. Harasser १. कष्ट देणारा. २ छळणारा. ३ जेरीस आणणारा. Harassing pr. p. and v. n. Harassment n. -the act. कष्ट m.pl. देणें n. २ छळणे n. ३-tha slate छळणूकf , छळ m, गांजणूकf.
Harbinger (hār'bin.jer) [M. E. herbergeour -Fr. auberge. See Harbour. या शब्दाचा मूळ अर्थ "पुढे जाऊन जागा पाहून तयारी करणारा" असा होता.] n. a forerunner अग्रदूत m, जासद m. २ a precursor ( as of spring, &c.) आगमसचक. H. v. t. to precede as a harbinger, to usher in (-ची) आगमा सूचना देणे; as, "Thus did the star of religious freedom H. the day." Harbingered p. b. and p.p. Harbingering pr. p. and v. n.
Harbour (här'-ber) | M. E. herberwe; prob. through O. Fr. herberge .O. Ger. hereberga a military encampment -heri, and bergan, to shelter. ] n. any refuge or shelter आश्रय (pop.) आसरा m, आश्रयस्थान n, थारा m, उभ राहण्याला जागाf (colloq.). २ a port for ships, a haven (गलबतें नांगरण्याचे) बंदर n, नांगरवाडा m. [ FLOATING (i. c. deep-water ).H. तरतें बंदर n. OPEN H. वाहतें बंदर THE SPACE OPPOSITE TO THE MOUTH OF A H. वारा m. H. DUES बंदरजकात f, बंदरफीf. H. WATCHI (गलबत नांगरून पडले असता ठेवलेला) बंदरपहारा m.] ३ (glass .work) a mixing box for materials (कांचेच्या कारखान्यांतील) मिश्रणपात्र n. H. v.t. to lodge, to shelter, to protect (-ला)आश्रय m -थारा m देणे. २ (तुफानापासन गलबताचा) बचाव करणे, नांगरणें. ३ to cherish, to entertain (an thoughts, in the mind ) (मनांत) बाळगणे ठेवण, धरणे, राहूं देणे, थारा देणे. H. v. i. to take shelter (as in a harbour) आश्रय करणे. २(बंदरांत) काही वेळ राहणे -थोडा मुक्काम करणे, बंदर करणे, नांगर टाकणे. Harbored pa.t. and p. p. Har'bourer m. आश्रयदाता m. २ मनांत बाळगणारा ठेवणारा. Harboring pr. p. and v. n. Har'bourless a. निराश्रीत , निराधार. Harbour-master n. बंदरमास्तर m, बंद राचा मुख्य अधिकारी m.
Hard ( häid) [A. S. heard, Dut. hard. Allied to Gr. kartys, strong. ] a. firm, solid, compact (applied to material bodies, and opposed to soft ) कठीण,टणक, ताठ, राठ, दृढ, निबर, चिकट, चिवट, कणखर, (as wood, stone, apple, &c.). २ difficult: (a) (-to the mind ) कठीण, अवघड, बिकट, गहन, दुर्योध; as " A H. problem." (b) (-to accomplish)