पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1784

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

as, "H. not your heart." H.v.t. दृढ कठीण घट्ट होणें,गोठणे, दृढावणे. २ ( bodily) दृढ मजबूत कठीण होणे, बनणे, कसणे, घटणे, जमणे, (in a bad sense) नित्तणें or निरडणे, पुरढणे, निपटणे, पुरा बनणे, तयार होणे. ३ ( a fruit, boil &c. ) दाठरणे, जारटणे. Hardened (pa. t. and p. p.) . कठीण केलेला, घट्ट झालेला. २ घटलेला, घटीद, घोटींव.३ confirmed in error or vice (दुष्कर्मात) निरढवलेला, निरडलेला, पुरढलेला, निपटलेला. ४ जारटलेला, जारट. Hardener n. कठीणपणा -ताठपणा आणणारा. २ (specif.) one who tempers tools हत्यारांना पाणी देणारा. Hardening pr. p. and v.n. making hard or harder कठीण जास्त कठीण करणे . २ that which, hardens ( as & material used for converting the surface of iron into steel) (हत्यारांना) पाणी देण्याचे द्रव्य . Hard'er compar. a.Hard-favored, H.-visaed a. रांकट, राठ, राठ शरीराचा तोंडावळ्याचा, उग्र. Hard'-favouredness n. (शरीराचा तोंडावळ्याचा) गठपणा m, शंकटपणा m. Hard'-featured a. Same as above. Hard'-fisted a. haring hard or strong hands (as a labourer ) ताठ, संकट, राठ, कणखर, बळकट, ताकदवान, सशक्त, मजबूत, भक्कम (गडी). २ covetous लोभी, चिकट, कंजुष, कृपण, कवडी न सोडणारा, कवडीचुंबक. Hard-fought a. निकराने लहलेली (लढाईf), निकराचा, घनघोर (संग्राम m), तुमुल pop. तुंबळ (रणn युद्ध n). Hard'-handed a. See Hard-fisted a. Hard'-headed a. sagacious, shrewd चलाख डोक्याचा, तीव्रबुद्धि, कुशाग्रबुद्धि, चाणाक्ष, दक्ष, अति तल्लख. Hard'-headedness n. Hard'-hearted a. निष्ठुर, पाषाणहृदयी, कठीण कठोर मनाचा, निर्दय, कठिनहृदय. Hard'-heartedness n. कठोरपणा m, निष्ठुरपणा m, निष्ठुरताf, नैष्ठुर्य n, &c. Hard'ihood n. bravery, intrepidity धिटाई f,धारिष्टn, धीटपणा m, छातीf, हिंमतf. २ बळकटपणा m, कणसरपणा,m बळकटीf, ताकद f, सहनशक्ति f. ३ audaciousness, impudence पृष्टताf, धाष्टर्य n, बेमर्यादपणा. m, अमर्यादपणा m, साहस n. Hardily adv. boldly धिटाईने, धीटपणाने. Hardiness n. कणखरपणा m. २ capability of endurance सोशिकपणा m, सहनशक्ति f. Hard'ish a. Hard'-laboured a. प्रयासाने साधलेला केलेला Hardly adv. with difficulty कष्टानें, मुष्किलीने,प्रयासाने, सायासाने, श्रमाने, मोठ्या जुलमाने. २ Unwillingly नाखुषीने, कसाबसा, जलमावर,जिवावर येऊन. ३ scarcely क्वचित, विरला. नाहींच म्हटले तरी चालेल अशा बेताने. N. B.:-The sense is often idiomatically expressed by the reduplication of a verb; as, मी घरास पोहचलों न पोंचलों इतक्यांत पाऊस आला=I had hardly got home when the rain came. ४ harshly, roughly कठोरपणाने, निष्ठरतेनें. Hard'-mouthed a. not sensible to the bit ( said of a horse) लगामीस न जुमानणारा