पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1662

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

bright darling light चकाकणे, झकाकणे, झगागणे, झळकणे, झळाळणे, झळझळणे, लकाकणे, तकाकणे. २ to look with fierce piercing eyes; to stare earnestly, angrily, or fiercely टौकारणे, or टौकारुन पाहणे, गुरकावून पाहणं, डोळे m. pl. फाडणें -गुरकावणे -पिंजारणे वटारणे चढवणे, क्रोधदृष्टीने पाहणे -गुरकावणे. ३ to be bright and intense (as colours ) चकाकणे. ४ to be ostentatiously splendid or gay फडकणे. G. v. t. झक्कदिनी बाहेर टाकणे. G. n. a bright darling light डोळे दिपवणारा चक्क करणारा प्रकाश m, चमक f, झकाकी f. २ a fierce piercing look or stare क्रोधदृष्टि f, झकाकी f. 3 a viscous transparent substance पारदर्शक चिकट पदार्थ m. ४ a smooth, bright, glassy surface (भिंगाप्रमाणे ) झगझगीत पृष्ठभाग m. G. a. smooth and bright ( used almost exclusively of ice ) गुळगुळित व चकाकित. Glar'eous, Glar'y a. उज्ज्वल, झकझकीत. Glar'iness, Glar'ing-ness n. उज्ज्वलता f, झकझकीतपणा m. Gla'ring a. उज्ज्वल. २ मोठा, भयंकर, ढळढळीत, अक्षम्य; as, "G. fault or mistake." Glar'ingly adv. सुस्पष्ट, उघड. Glass (gläs ) A. S. glaes and Dut. glas, Gr. glas. ] n. a substance transparent, lustrous, hard, and brittle, produced by fusing sand ( silica ) with soda or potash ( or both ) usually with the additon of one or more other ingredients, especially lime, alumina, lead oxide काच pop. कांच f. वाळू, सोडा, किंवा (शुद्ध केलेला) पोट्याश व केव्हा केव्हां चुना, अॅल्युमिना, व शिशाचा ऑक्साईड ही एकत्र करून कांच तयार करितात. [ CROWN G. (खिडक्यांची तावदाने करण्यास उपयोगी पडणारी) मुगुटी कांच f. ही गारेच्या कांचेपेक्षां कठीण असते, व ही फुकून तयार करतांना महाळुगाच्या किंवा मुगुटाच्या आकाराची बनते. CRYSTAL Or FLINT G. गारेची कांच f. PLATE G. आरशाची जाड कांच f. SOLUBLE -WATER G. विद्राव्य कांच f. WINDOW G. खिडक्यांचे भिंग n, कांच f.] २ any sutstance, artificial or natural, having properties of chemical combination similar to that of glass कांचेसारखा जिन्नस -पदार्थ m. ३ (collect. sing.) कांचेची भांडी n. pl., कांचेचे दागिने m. pl., कांचेची तावदाने n. pl., कांचपात्रे n. pl. esp. (a) a looking -glass आरसा m, (dim.) आरशी f, आदर्श m (S.), दर्पण m (S.). (b) an hourglass वाळूचे घड्याळ n, घडी f, काचघटी f. (c) ( hence ) the time in which such a vessel is exhausted of its sand सदरहू घड्याळांतील सर्व वाळू एका भागांतून दुसऱ्या भागांत जाण्यास जाे वेळ लागतो तो (वेळ ) m. (d)a drinking vessel, a tumbler (पेय पिण्याचा) प्याला pop. पेला m, ग्लास n ( from Eng. word which is now common in colloq. Marathi ), गलास n (vulg.). (e) ( hence) the contents of such a vessel, (esp. ) spirituous liquors पेल्यांतील वस्तु f, दारू f, मद्य n, मदिरा f, &c.