पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1661

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणारा. 2 flying off (after striking) in an oblique manner वांकडी जाणारी (बंदुकीची गोळी वगैरे). Glan'cingly adv. ओझरता, झांजरता, कातरता, कसरत, चुकता. २ transiently अल्पमात्र, किंचित्, ईषत् (S. ). ३ incidentally आकस्मिक, प्रसंगवशात, सहज नजर पडल्यामुळें. ४ indirectly अप्रत्यक्ष रीतीने. Gland (gland) [Fr. glande -L. glandula, dim. of glans, glandis, an acorn; from the likeness of shape to an acorn. ] n. anat. ( a) an organ for secreting something to be used in, or eliminated from, the body (सूक्ष्म मांसमय कण एकमेकांस चिकटून झालेला, व पुष्कळ केशवाहिन्यांनी युक्त असा) मांसपिंड m, मांसग्रंथि m (?), पिंड m, ग्रंथि m (?), अधिमांस (S.). (b) an organ or part which resembles a secreting, or true, gland मांसपिंडासारखें इंद्रिय n, पिंड m, ग्रंथि m. २ bot. ( a.) a special organ of plante which often secretes some kind of resinous, gummy, or aromatic product पिंड m, ग्रंथि m, रसपेशी f. (b) any very small prominence लहानसर टेंगूळ n. ३ ( steam mach.) the movable part of a stuffing box by which the packing is compressed दट्याचा दांडा (piston rod ) ज्या भोंकांतून बाहेर येतो जातो त्या भोकांतून वाफ बाहेर येऊ नये म्हणून त्या दांडयाला गुंडाळलेली तेलांत भिजविलेली आंबाडी गच्च दाबून धरण्याकरिता जे बिनबुडाच्या पंचपात्रीसारखें झांकण असतें तें, ग्ल्यान m (Gland शब्दाचा अपभ्रंश.). Glan'dule n. dim. of Gland. अल्पग्रंथि m, लहान गांठ f. Glanduli'ferous a. ग्रंथियुक्त. Glandulose, Glan'dulous a. ग्रंथिसदृश, गांठीसारखा. Glan'dulo'sity n. ग्रंथिसदृशता f. Glandula'tion n. bot. पिंड रचना f, ग्रंथिरचना f, रसपेशीभवन n. Glanders (glan'-derz ) [ From Gland. See above. ] n. pl. (far.) a highly contagious and very destructive disease of horses, asses, mules, &c. characterised by a constant discharge of sticky matter from the nose, and indurarion of the enlargement and induration of the glands beneath and within the lower jaw सेंबा m. घोड्याच्या (गाढव, खेंचर, इ. कांच्या) शरीरांतील मांसपिंडां (glands) स होणारा रोग m. हा रोग झाला असता त्यांच्या नाकपुड्यांतून चिकट पिवळे पाणी निघतें, व खालच्या दाढेतील मांसपिंड वृद्धिंगत (विस्तृत) होतात. [ ACUTE G. एकदम उत्पन्न होऊन फार बळावणारा सेंबा m. CHRONIC G. फार दिवसांचा व फार मेहनतीने समजणारा सेंबा m. INSIDIOUS G. समजण्यांत न येणारा सेंबा m. ] Glans (glanz) [L. ] n. the apex of the penis शिस्नाग्र n, शिस्त्राची सुपारी f. Glare ( glaer ) ( A. S. glaer, a pellucid substance gamber; akin to Glass. ) v. i. to shine with a