पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1633

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायमंदिराचा मार्ग m. Gates of death मृत्यूचा दरवाजा m, (i.e. जवळ येऊन ठेपलेले) मरण n. Gather ( gath'ér ) [ A. S. gaderian -A. S. gade, company. ] v. t. to bring together, to assemble, to muster (people &c.) गोळा करणे, जमविणे, जमा करणे, एकवटणे, एकत्र -एकवट करणे, संग्रह m-संचय m. करणे, मिळवणे, कवळणे, गुंडाळणे, एके ठिकाणी करणे. २ to cull, to harvest, to pick off, to pluck तोडणे, काढणे, तोडून काढून घेणे, उतरणें, तोडणी f-तोडा m. &c. करणे g. of o., खुडणे, खुडून घेणे, वेचणे. ३ to amass, to gain, to heap up (things ) जमविणे, सांठविणे, संचय m -संग्रह m करणे, (ची) पुंजी करणे, गोळा -जमा करणे. ४ (a) to contract, to compress संकुचित करणे, आंखडणे, अखुडणे, आटोपणे. (b) (also ) to pucker, to plait मुरुडणे, मुरडणे, सुरकुतवणे, सुरकत्या घालणे, मुरड -मुरूड घालणे, चूण पाडणे. ५ to collect, derive, or deduce as inference; to conclude अनुमान n -तर्क m. करणे -काढणे -बांधणे, हाशील n तात्पर्य n. घेणे, तर्काने -तर्क करून -अनुमानाने काढणे, सार ठरविणे. ६ arch. to bring together, or nearer together, in masonry आंवळीत आंवळीत आणणे, अरुंद करीत आणणे. ७ naut. to haul in, to take up खेंचून ताणून घेणे -धरणें. G. v. i. to come together एकत्र होणे, मिळणे, गोळा-जमा-एके ठिकाणी होणे -येणे. २ to unite जुळणे, एक होणे, मिळणे, जूट करणे. ३ to grow larger by accretions, to increase वाढणे, मोठा होणे, बधारणे (Guj.). ४ to concentrate, to come to a head and generate pus पुवळणे, पुवळणास येणे, पुधारणे, (आंत) पू होणे, पुलेणे, पुलेजणे. ५ to collect or bring things together जमा करणे. ६ to pucker सुरकुतणे, सुरकुत्या पडणें with ला of s., अखुडणे, मुर (or -रु) डणे, चुणणे. G. n. a plait, a pucker सुरकुती f, चिरमी f, झुरळी f, चूण f, मुर (or -रू) ड f, चीण f. Gath'erer n. Gath'ering n. -the act. गोळा करणे n, संग्रह करणें n, समाहार m. २ that which is gathered; as, (a) a crowd, an assembly सम्मेलन n, जमाव m, गर्दी f, समाज m, मंडळी f, सभा f, समूह m, संघ m, &c. (b) a collection on charitable contribution धर्मादायाची वर्गणी f, वसूल m. Gath'ered a. गोळा केलेला, एकवटलेला, संग्रहीत, संचित, मीलित, &c. २ तोडलेला, उतरींव. ३ सांवरलेला, माटपलेला. ४ मुरडलेला, मुरड घातलेला. To be gathered to one's people or fathers मरणे. To gather one's self together आपल्या आंगातील सर्व शक्ति एकवट करणे, To gather to a head पूर्ण तयार होणे, परिपक्क दशेस येणे. Gandy (gawd'i) (M.E. gaude, an ornament, -L. gaudium, jog gaudere.) a. (Now chiefly in disparaging sense ) excessively or glaringly showy, tustelessly gay or fine भपकेबाज, भपकेदार, डौलाचा,