पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1541

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

F. मूळव्याधीचा मोड कापण्याच्या वेळी ते पकडण्याचा चिमटा m. RING-SHAPED F. तरक्षुमुखसंदंश m. SEQUESTRUM F. रुक्षमुखसंदंश m, हाडाचा तुकडा ओढून काढण्याचा चिमटा m. SINUS F. नाडीव्रणांत चाकू घालण्यासाठी मार्गदर्शकाच्या कामी उपयोगी चिमटा m. TONGUE F. जीभ बाहेर राहावी म्हणून ती पकडून ठेवण्याचा चिमटा m. TORSION F. शिरेचें तोंड पिळवटून रक्तबंदी करण्याचा चिमटा m, मुचुंडीसंदंश m. URETHRAL F. ( मूत्रनळीतून) मुतखडा काढण्याचा चिमटा m -संदंश m.] Ford (ford) [M. E. ford, also forth. A. S. ford, a ford, passage.] n. a place in a river, or other water, where it may be passed by man or beast on foot, by wading उतार m, पायउतार m, पार m. २ a stream, a current (पाण्याचा) ओढा m, ओहोळ m. F. V.t. to wade through पायउताराने उतरणे, पायाने (नदी) उतरून पलीकडे जाणे, पायीं उतरणें. Ford'able a. पायाने-पायीं उतरायाचा, उतरायाजोगा, पायउतार, थोडे पाणी असलेला (उतार) असलेली (नदी). Ford'ableness n. Fordless a. उतार नसलेली. Fore (for) [A. S. fore, radically the same as for: prep. To be distinguished from the prefix. for (Ger. ver, in vergessen. L. per.)] a. situated or appearing in front, in front of something else (opp. to back or hind) पुढचा, समोरचा, पुढे-समोर असलेला,समोरील, पुरोवर्ती, अग्रवर्ती, पुढील, अग्रिम, मोहोरचा, मोहोरला, मोहरील, अग्र, पूर्व (in comp.; as, अग्रभाग, पूर्वसूचक ). २ anterior, precedent, earlier पूर्वीचा, अगोदरचा. The F. and the hinder पुढलामागला. F. adv. in the part that precedes or goes first, in advance (opp. to aft, after, back, behind, &c.) पूर्वीच्या-अगोदरच्या भागांत, आधी, पूर्वी. ३ naut. in or towards the bows of a ship (गलबताच्या) नाळीकडे. F. & aft adv. naut. from stem to stern (in distinction from athwart) सर्व गलबतभर, (गलबताच्या) या टोकापासून त्या टोकापर्यंत, नाळीपासून वरामापर्यंत. २ (of motion or direction) backwards & forwards पुढेमागे, मागेपुढें. F. & aft a. placed. or directed in the line of the vessel's length नाळीपासून वरामापर्यंतचा. F. prep. The use of Fore as a preposition is now obsolete. (Sometimes written 'fore as if & contraction of afore or before). F. n. the front, the fore part of anything अघाडी f, पुढचा भाग m -बाजू f. २ (hence) that which is in front, the future भविष्य काळ m, पुढे होणारी गोष्ट f. ३ naut. the bow of a ship नाळीची बाजू f, नाळ f. To the F. present on the spot, within call (जागेवर) हजर, जवळ, ऐकू येण्याजोग्या अंतरावर. २ still surviving or living अद्यापि हयात जीवंतः as, "The steward, though stricken in years, is still to the F." ३ ready at hand, avail