Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्ली - दरबार.

६३

च ठरे, चित्र पताका, सुखद बैठका, महाराज राजेश्वर राणे, रावल ठाकुर राव पुराणे, नबाब बेगम नबाबजादे, खानीखानान ही सुलतान, मीर अमीर, जुने उमराव खानबहादर, राय- बहादर शम्-सुलू-उल्मा, महामहोपाध्याय इतरही, बडे लोक कामदार मानी, काळे गोरे भृत्य इमानी, मुसलमान रजपूत मराठे, शीख जाट ही शान भुतानी, काश्मीरी सिंधी नेपाळी, चिनी आणि ब्रह्मी बंगाली, कन्नड तामिळ जन मलयाळी, तमाम ऐसे निमंत्रिलेले लोक बसाया, दिवाणखान्यापरी सुबकसा, तंबू मोठा त्यांतचि गर्भी बादशाहाचे तख्त मांडिलें तें सोन्याचें, पडदे सुन्दर किनकाफाचे, पायांखालीं छान जरीचे, आंथरिले ते मऊ गालिचे, इतर वर्तुळीं सुरम्य दुसरें, सिंहासन भूपास साजिरें, सभोंवार उमराव धुरंधर, बसावयाची सोय चांगली, एकाखाली एक पायरी, संगमरवरी, ऐशापरिची रम्य योजना, केली दरबाराची, अद्भुत कृति ते साची ॥ ४ ॥
 दरबाराची वेळ जाहली, स्वस्वस्थानीं सर्व मंडळी, वेळेवर येऊनि बैसली, मध्याह्नाची वेळ ठेपली, सुस्वर वाद्ये वाजूं लागली, काळ्या गोऱ्या भडक पलटणी, तडक दुजी एकीच्या मागुनि, भव्य पटांगणिं, उभ्या राहिल्या सज्ज होउनी, वीस हजार बडे लढवय्ये, शीख जाट गुरखे पुरभय्ये, पठाण कडवे आणि रोहिले, शूर मराठे चपळ मावळे, क्रमाक्रमानें येउनि ठेले,