Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
राज्यारोहण.

लागला, तोंच धुराचा लोट निरखिला, भकभक सुरसुर शब्द उमटला, आगगाडिचा सिग्नल पडला, बादशहा आला, लोकां हर्ष बहू झाला ॥ २ ॥
 स्वारी सेलिमगडीं पातली, तोफांची सरबत्ती झडली, रणवा- द्यांची धूम उसळली, सलामीस उमराव मंडळी, जाउनि सादर उभी ठाकली, सारंगा घोड्यावर बसली, खासा स्वारी पुढें निघाली, अघाडीस काळ्या घोड्यावर, सरमाधव आलिजाबहादर त्यांजसवें पांढऱ्या हयावर, विकानीरचे शूरवीर सर प्रताप तैसे, रामपुरीचे नबाब खासे, पुढति चालती, खाशा स्वारी मागें सुरर्थी, चक्रवर्तिनी श्री मेरि सती, परिचारक-गण तिच्या सभोंतीं, पिछाडीस राजाचे मत्री, राज्य सुयंत्रित ज्यांच्या तंत्री, चाले तो अधिकारि- पुरुष - गण, शूरवीर सरदार बहादर, अश्वपदाती, असंख्यात त्या मागें येती, सम्राटाचें रक्षण करिती, स्वारी ती आली, सगळी दिल्ली गजबजली ॥ ३ ॥
 अजब त्या दरबाराचा थाट, वर्ण न शके चारणभाट, मंडप रचिला थोर अफाट, युक्ती तैशी कृतिहि अचाट, एककेन्द्रवलय- द्वयघाट, लक्ष मनुष्यांचा तयिं साठ, सिंहासनस्थ श्री-सम्राट् अधोभागं त्याच्या तो लाट, पहावयाचा न हो बोभाट, बेत करूनी आटोकाट, मंडप रचिला, चोहोंबाजुंनीं भव्य कमानी, दिव्य तोरणें, स्तंभीं स्तंभीं कळस साजिरे, दृष्टी क्षणभर जयीं न