Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
राज्यारोहण.

फिरुनि वाजल्या शिंगतुतान्या, चोबदार मारिति ललकाच्या, मंत्र प्रतिनिधि यांच्या स्वाच्या, येतां लगबग दरबारीं त्या बहुत जाहली, सर्व मंडळी सलामीस ती खडी राहिली, हा कोलाहल न जो थांबला, तो फिरुनी झणझणाट उठला, तोफांचा खडखडाट झाला, भूमिभाग तो थरथर हलला, सम्राड्-रथ तो दिसूं लागला, पुढे थोर दळभार चालला, येतां येतां हळू हळू तो, दिव्यस्यन्दन जवळ पातला, हर्षाचा कल्होळ मातला, दरबारा आला, अधिनृप लोकांतें दिसला ॥ ५॥
 आठ राजपुत्रांनी जामा, चक्रवर्तिचा उचलुनि धरिला, चक्रव- र्तिनीच्या खिदमतिला, सादर सन्निध राजकुमार-द्वय राहियलें, अपार कुतुकें जनीं देखिलें, सम्राटाचे शिरीं हिन्याचा मुकुट शोभला, सुवर्ण-दंडावरी भरजरी आतपत्र तें, चामर दों बाजूस वारिती, चोबदार ललकारी मारिति, ऐशा विभवें सावकाश सर्वांची प्रणती, घेतघेत ती राजदंपती, दरबाराच्या गर्भी आली, सिंहासनं आरूढ जाहली, आनंदाची उकळी फुटली, सर्वांनीं सानंद वंदिली, मग आज्ञेनें कंठरवानें घोष करूनी, अधिकृत पुरुष, दरबार सुरू केला, हर्षा पार नसे उरला ॥ ६ ॥