Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्ली - दरबार.

६१

दिल्ली - दरबार.
(कटाव.)
दिल्लीचा दरबार, ऐका त्याचा हा अखबार ॥ ध्रु० ॥

 बादशाहाच्या आगमनाचा दिवस उगवला तो सोन्याचा, चक्रवर्तिला पहावयाचा, सुयोग आला बहु भाग्याचा, ऐसें मानुनि जों आभाळी, तांबड कोठें फुटू लागली, तों दिल्ली खडबडून उठली, राजमार्ग येऊन थडकली, राजदर्शना आतुर झाली, गच्या ओटे पाहुं लागली, बसावयाला सोय चांगली, कोणी उंच तरूच्या खालीं, पाहुनियां घनदाट सावली, पोरेबाळें सान चिमुकलीं, कटिखांद्यावर घेउन बसलीं, सम्राड्मार्गी दृष्टि रोंखिली, सान मुलें ही भूक विसरली, चित्रासम तीं तटस्थ ठेलीं, उत्कण्ठित झालीं, अधिपा पहावया आलीं ॥ १ ॥
 जों न दहाचा ठोका पडला, तों दळभार सकलही हलला, स्वस्वस्थानीं गोरा काळा, राजमार्ग रोंखुनियां ठेला, आपआपला वेष निराळा, लाल पांढरा तुमान डगला, टोपी फेटा कंबर- पट्टा, संगिन बंदुक बर्ची भाला, तुस्त कसुनियां सज्ज जाहला, बादशाहाच्या मार्गी डोळां, लावुनि बघतां चित्र भासला, जणुं दगडाचा करूनि पुतळा, राजपथीं तो निपट बसविला, सभोंवार जन झाला गोळा, एकदील सर्वोचा झाला, दिवस हळु हळू चढूं