Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
राज्यारोहण.

[ सर्ग ५

सम्राट् प्रसादा परिसूनि कानीं
जयध्वनी प्रक्रमिला जनांनीं ।
तो सागराच्या लहरीप्रमाणें
क्षणोक्षणी वाढत जाय मानें ॥ ६२ ॥

हा आटोपुनि कार्यभाग सगळा, भूपाळ संतोषला
आला त्या विभवें पुनश्च पहिल्या तो मंडपीं पातला ।
राज्ञीच्या समवेत घेत मुजरे सिंहासनीं बैसला
लोकांनी अभिनंदिला, जयजयध्वानें पुन्हां वंदिला ॥६३॥

सर्वत्र होतांच पुनश्च शान्ती
तो गोड वाणी नृप - चक्रवर्ती
बोले प्रजेला, जणुं गोड घास
तो जाहला भूपतिचा निदेश ॥ ६४ ॥
“जें श्रेय होय सचिव-प्रतिभूविचारें
तें सांगतों करुनि निश्चित आज सारें ।
हे दिल्लि सर्व नगरींत जुनी पुराणी
केली असे भरतभूतलिं राजधानी ॥ ६५ ॥
तैसाच वंगजन राहिल एकछत्रीं
होईल पालन तदीयहि एकतंत्रीं ।
हा होउं पालट सुखावह मत्प्रजेला
प्रेमें प्रसाद ह्मणुनी दिधला तुह्मांला " ॥ ६६ ॥