Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली - दरबार.

५७


जैसा कोंदण बैठकींत गहिरा अत्यंत शोभे हिरा
सोन्याच्या मखरांत तेंवि नृपती सिंहासनीं साजिरा ।
लावूनि स्वकरां भुईस, मुजरा त्या राजराजेश्वरा
संराज्ञीसह, सर्व सभ्य करिती हो चक्रवर्ती खरा ॥ ५७ ॥

हा पूर्ण होतां प्रकृतिप्रणाम-
संस्कार, तो भूपति पूर्णकाम |
उठूनि राज्ञीसह सज्ज जाया
द्वितीय सिंहासन आक्रमाया ॥ ५८ ॥
पुनश्च तूर्यादिक वाद्य घोषणा
पुनश्च अस्त्र - गभीर-गर्जना ।
पुनश्च सम्राट् परिवार चालला
यथाक्रमें मण्डपं जेंवि पातला ॥ ५९॥
पुनश्च सिंहासनं तो विराजला
राजश्रियेच्या उपचारिं वेष्टिला ।
त्या प्रांगणीं वीस हजार सैनिक
 येऊनि ठेले नृपराजसंमुख ॥ ६० ॥
त्यांहीं सलामी नृपचक्रवर्तिला
देऊनि आनन्द तथा निवेदिला ।
मागून भूपप्रतिभू विचक्षण
स्वयें करी स्वामिकृपा - निरूपण ॥ ६१ ॥