Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली - दरबार.

५९

पुणे मराठी ग्रंथालय १३७ व, नारायग पेठ, २
हे शब्द कानिं पडतांच, समुद्र जैसा
हेलावला सकलही जन तो अपैसा ।
आनन्दविस्मयवशे जणुं नष्टसंज्ञ
तो भासला जन नृपालपदीं कृतज्ञ ॥ ६७ ॥
आटोपुनी सकल तें दरबार - काज
आला तसा परतला क्षितिपाधिराज ।
नेपाळदेशिं मग तो मृगया कराया
जाई कृतार्थ, बहुल श्रम ते हराया ॥ ६८ ॥
अनेक भूपोचित-शिष्टकायें
करूनियां भारतभूपवर्ये ।
प्रयाण आंग्लावनिलागि केलें
वाटे प्रजाचित हरूनि नेलें ॥ ६९ ॥

संस्थानें न च हीं, परी विखुरले देशांत या प्रस्तर
अस्ताव्यस्त समस्त, त्यांस घडुनी साम्राज्यस मन्दिर ।
ज्यांनीं हें रचिलें प्रसन्न झणुनी त्या आंग्ल-भूभृत्करीं
ठेवी येथिल राज्यसूत्र सगळें अस्मद्धिता श्रीहरी ॥ ७० ॥

अव्यक्त निष्ठेस हि मूर्तरूप
ज्यानें दिलें तो जनिं वंद्य भूप ।


 1 A remark attributed to the late Tukoji Rao Holkar grandfather of the present Chief of Indore.