Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
राज्यारोहण.

[ सर्ग ५


संतोष हा व्यक्त जनीं करावा
राज्याधिरोहोत्सव हा स्मरावा ।
ह्मणून केल्या मदनुग्रहतें
वर्णी तो मत्प्रतिभू तुम्हांतें ॥ ५२ ॥
जे हक, जे मान हि पेशजीचे
दिलें समाश्वासन पाळण्याचें ।
सन्मान्य माझ्या पितरीं तुह्मांतें
पाळीन निर्वाचि मीहि ते ते ॥ ५३ ॥
संतोष, शान्ती, सुख या जनांत
राहो अशी जी धरिली मनांत ।
मत्पूर्वज तीच तयांसमान
चिन्ता मनीं संतत वागवीन ॥ ५४ ॥
प्रभु सदय करो कृपा, मदीय
प्रकृतिजनीं, मज तो असो सहाय ।
प्रकृतिसुखसमृद्धि साधण्यातें
मज वितरो बल, हीच भाक त्यातें" ।। ५५ ॥
वदूनि ऐसें क्षितिभृल्ललाम
भूपां, प्रजेतें करुनी सलाम ।
सिंहासनीं तो बसतां उदण्ड
हर्षे जयध्वान उठे प्रचण्ड ॥ ५६ ॥