Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५]
दिल्ली-दरबार.

५५

सामन्तभूपांवरि राजनिष्ठ
प्रजेवरी प्रेम मनीं प्रकृष्ट
तें दाविण्या उत्सुक फार झालों
saणून राज्ञीसह येथ आलों ॥ ४७ ॥
सिंहासनारोहसमुत्सवाला
येणें न ज्या ज्या घडलें जनाला ।
त्या त्या जना उत्सव आज भाग
घ्यायासि हा आणियला सुयोग ॥ ४८ ॥
प्रांताधिकारी, दुसरे इमानी
मद्भृत्य, सामन्तनृपाल मानी ।
लोकाग्रणी, सैनिक मुख्य रंगीं
पाहूनि धालों बहु अन्तरङ्गी ॥ ४९ ॥
ते स्वामिभक्ती निज दाखवाया
येतील मातें मुजरा कराया ।
घेऊनि तोषें मुजरे तयांचे
करीन साफल्य तदीप्सिताचें ॥ ५० ॥
प्रजा, तशी भूपति एकचित्तीं
प्रीती तशी सान्द्र सहानुभूती ।
माझ्यावरी या समयीं करीती
तें पाहुनी तोष मदीय चित्तीं ॥ ५१ ॥