Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
राज्यारोहण.

[ सर्ग ५

आला नृपाल दरबार खुला कराया
राज्यप्रतिग्रह जना स्वमुखें कथाया ।
त्यावेळचा अजब थाट पहावयाला
वर्णावया क्षितिस गीष्पति कां न आला ॥ ४२ ॥
सामन्तभूभृदभिनन्दित चक्रवर्ती
सर्वाभिवादित, समाहृत-चित्तवृत्ती ।
श्वेतातपत्र, शिरिं रत्नकिरीट साजे
सिंहासनस्थ दयितेसह तो विराजे ॥ ४३ ॥
सिंहासनीं वसुनियां निजघोषकातें
आज्ञापिलें प्रकृतकार्य करावयातें ।
झाला प्रचण्ड शतदुन्दुभि- तूर्य - नाद
केला अनन्तर नृपें निजवाक्प्रसाद ॥ ४४ ॥
“राज्ञीसवें येथ पुनश्च आलों
सर्वां तुह्मां भेदुनि धन्य झालों ।
हें वर्ष गेलें बहुधा श्रमाचें
नैमित्तिकाचें परि उत्सवाचें ॥ ४५ ॥
जें प्रेम केलें स्वजनासमान
आह्मांवरी तें मनिं आठवून ।
सिंहासनारोहणं बोललों तें
आलों पुन्हां पूर्ण करावयातें ॥ ४६ ॥