Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ५ ]
दिल्ली - दरबार.

५३

मागें नृप - प्रतिनिधि, अभिजात मन्त्री ।
जे राजकार्य करिती सविवेक तीं ।
त्या मागुतीं रथिं धुरंधर कामदार
सेनापती अतिरथी, दळभार थोर ॥ ३७ ॥
भरला दरबार बादशाही
उपमा त्यास कथापुराणि नाहीं ।
विसरूनि पुराण भिन्न भाव
जन झाले अवघेहि एक जीव ॥ ३८ ॥
अवघें धन भारतावनीचें
अवघे वैभव त्या ब्रितानियेचें ।
जणुं एकवटून उत्सवाचें
रचिलें कौतुक, पारणें दृशेचें ॥ ३९ ॥
रचिला पटमण्डप प्रयत्नीं
पटुता दाविलि ज्यांत शिल्पिरत्नीं ।
बसले जन ज्यांत लक्षसंख्य
परि झालें नच लेशही असौख्य ॥ ४० ॥
सिंहासनद्वय तथा पटमण्डपांत
केलें सुरम्य, भरतावनिनाथ जेथ ।
सर्वोचिया सहज दृष्टिपथांत यावा
तद्दर्शनें सकल लोक कृतार्थ व्हावा ॥ ४१ ॥